milk price problem in state | Sarkarnama

कोल्हापूरजवळ किणी टोल नाक्‍याला पोलिसांची जबरदस्ती, शेतकरी आंदोलकांची धरपकड

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 जुलै 2018

कोल्हापूर : दूध दर वाढीसाठी आंदोलन पुकारणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून पुणे बंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका येथे संघटनेने चक्काजामचा नारा दिला होता. मात्र किणी टोल नाक्‍यावर आंदोलकांचे नेते पोहोचताच पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी संघटनेचे नेते भगवान काटे हे पोलिसांच्या वाहनासमोर झोपले पण पोलिसांनी त्यांना उचलून वाहनात घातले. पोलिसांच्या दडपशाहीविरुद्ध शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. 

महामार्गावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टोल नाक्‍याला तर पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुलाची शिरोली, वाठार याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संघटनेचा बिल्ला दिसला की कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. दूर दर वाढीच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र सरकार व संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन्ही बाजू आपापल्या मुद्यावर ठाम असल्याने या आंदोलनाची कोंडी झाली आहे. राज्यात आता सगळीकडेच दूधाची टंचाई जाणवू लागली आहे. 

संबंधित लेख