आमदार कर्डिलेंनी पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली!

डॉ. कांकरिया यांची 92 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, प्रकाश कर्डिले यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आमदार कर्डिलेंनी पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली!

नगर  : व्यवहार झालेली जमीन दुसऱ्याच व्यक्तीला विकल्यानंतर आमदार शिवाजी कर्डिले व प्रकाश कर्डिले यांना दिलेले 92 लाख रुपये परत घेण्यासाठी त्यांनी बोलल्याप्रमाणे 7 डिसेंबर 2011 रोजी मी व डॉ. कांकरिया यांच्यासोबत आमदार कर्डिले यांच्या बंगल्यावर गेलो. त्या वेळी कर्डिले यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जमिनीचे मूळ साठेखत हिसकावून घेतले. तसेच पुन्हा 92 लाख रुपये मागितल्यास खलास करुन टाकीन, अशी धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिलिंद मोभारकर यांनी आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सरतपासणीत सांगितले. 

डॉ. कांकरिया यांची 92 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, प्रकाश कर्डिले यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या खटल्याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चांदगुडे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. ऍड. प्रकाश कोठारी यांनी आज साक्षीदार सरतपासणी घेतली. सरतपासणीत साक्ष देताना मोभारकर म्हणाले की, "डॉक्‍टर प्रकाश कांकरिया यांना आमदार शिवाजी कर्डिले व प्रकाश कर्डिले यांनी बुऱ्हाणनगर येथील सर्वे नंबर 282 व 283 मधील 23 एकर जमीन प्रतिएकरी सव्वासहा लाख रुपये दराने देण्याचा व्यवहार ठरला होता. त्याचे पहिले साठेखत 2002 मध्ये झाले होते. सदर साठेखताचे सन 2006 मध्ये नूतनीकरण झाले. या जमिनीपोटी कर्डिले यांना वेळोवेळी 92 लाख रुपये दिले होते. परंतु दरम्यानच्या काळात ही जमीन कर्डिले यांनी डॉ. अनभुले यांना विक्री केली. त्यामुळे जमिनीच्या व्यवहारापोटी आत्तापर्यंत दिलेले 92 लाख रुपये परत घेण्यासाठी आमदार कर्डिले यांनी डॉ. कांकरिया यांना 7 डिसेंबर 2011 रोजी त्यांच्या बंगल्यावर बोलाविले होते. त्या वेळी मी व डॉक्‍टर कांकरिया बंगल्यावर गेलो. तेथे गेल्यानंतर कर्डिले यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून डॉक्‍टरांकडील जमिनीचे साठेखत हिसकावून घेतले. त्यानंतर नगरमध्ये डॉक्‍टरकी करायची असेल तर 92 लाख रुपये विसरून जा. नाहीतर खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली.'' 
आज सकाळच्या सत्रात मोभारकर यांची सरतपासणी पूर्ण झाली. या खटल्याचे कामकाज पाच फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. 
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com