milind mane mla nagpur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

भाजप आमदार माने पत्रकारांवर घसरले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नागपूर : नागपुरातील भाजपचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी आज प्रसार माध्यमांवर हल्लाबोल केला. नागपुरातील भाजप आमदारांना "नापास' करणाऱ्या पत्रकारांनाच समोर आणा. मी त्यांना "नापास' करतो, अशा शब्दात पत्रकारांवरील नाराजी व्यक्त केली. 

नागपूर : नागपुरातील भाजपचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी आज प्रसार माध्यमांवर हल्लाबोल केला. नागपुरातील भाजप आमदारांना "नापास' करणाऱ्या पत्रकारांनाच समोर आणा. मी त्यांना "नापास' करतो, अशा शब्दात पत्रकारांवरील नाराजी व्यक्त केली. 

नागपूर शहर भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात पार पडली. या बैठकीचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. त्यापूर्वी शहरातील आमदारांची भाषणे झाली. यावेळी उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी पत्रकारांवर हल्लाबोल केला. एका वर्तमानपत्राने नागपुरातील भाजप आमदारांच्या कामांचा आढावा घेणारी पुस्तिका प्रकाशित केली. यामध्ये नागपुरातील भाजपच्या तीन आमदारांचे रेटिंग असमाधानकारक आहे. हे आमदार "नापास' झाल्याचे पुस्तिकेत म्हटले आहे. 

या पुस्तिकेचा हवाला देत डॉ. माने यांनी पत्रकारांवर हल्लाबोल केला. काही दिवसांपासून भाजपचे आमदार-खासदार काही ना काही कारणांमुळे चर्चेत राहत आहेत. खासदार नाना पटोले यांनी पक्षाच्या नेत्यांवर हल्लाबोल केल्यानंतर, आमदार राजू तोडसाम यांनी ठेकेदाराला 20 लाख रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर आमदार आशीष देशमुख, डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे आमदारही वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले होते. वादाची ही मालिका डॉ. माने यांनी सुरू ठेवली. डॉ. माने यांनी नापास झालेल्या तीन आमदारांची नावे सांगितली नाही. डॉ. माने यांनी स्वतःच या मुद्याला उचलल्याने "नापास' आमदारांमध्ये त्यांचे नाव निश्‍चित असावे, अशी चर्चा नंतर रंगली होती. 

 

 

संबंधित लेख