एमआयडीसी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

.
 एमआयडीसी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एक जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने याची अमंलबजावणी केली जाणार आहे.

राज्याचे उद्योगमंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक सोमवारी पार पडली. यामध्ये सर्वांनुमते कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे एमआयडीसीला अंदाजे 130 कोटी रुपये देणे करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यावर यावेळी निर्णय घेण्यात आला.

 त्यांच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करण्याची शासनाला शिफारस केली जाणार आहे. इतर कर्मचाऱ्यांची थकबाकी एकरकमी रोख स्वरुपात देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या शिवाय महामंडळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान काम-समान वेतन या तत्त्वावर वेतनवाढ व इतर लाभ देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊन कार्यवाहीच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com