mhada ceo | Sarkarnama

म्हाडाच्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे  विश्वासू अधिकारी मिलिंद म्हैसकर 

सरकारनामा ब्यूरो 
बुधवार, 7 जून 2017

मुंबई : राज्यात सध्या बदल्यांचा हंगाम आहे. त्यामुळे दररोज सामान्य प्रशासन विभागातून बदल्याच्या निर्णय बाहेर पडत आहेत. आता म्हाडाच्या उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची तर नाशिक आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी डी. बी. गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. 

आज पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे निर्णय घेतले आहेत. म्हैसकर हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. म्हाडासारख्या अतिमहत्वाच्या प्राधिकरणावर आपली पकड रहावी म्हणूनच ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. म्हाडाच्या उपाध्यक्षपदावरून एस. एस. झेंडे हे एक महिन्यापुर्वीच निवृत्त झाले होते. त्यानंतर मुंबई म्हाडाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता. डी. बी गावडे यांची नियुक्ती नाशिक आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तीपदी करण्यात आली आहे. ते नगर महानगरपालिकेचे आयुक्त होते. 

त्यांच्या जागी जी. सी. मंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगले हे नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांची बदली करण्यात आली आहे. याबदली मागे पालकमंत्री राम शिंदे यांची नाराजी असल्याची माहिती सुत्रांनी सांगितली. तर नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून व्ही. व्ही. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

संबंधित लेख