meyor of mumbai | Sarkarnama

महाडेश्वर यांच्याकडून मलबार हिलवरच्या बंगल्याची मागणी

ब्रह्मदेव चट्टे
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई : महापौर निवासस्थानासाठी राणीच्या बागेतील बंगला देण्याऐवजी मलबार हिल येथील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला द्यावा, अशी मागणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे. यासंबंधी महाडेश्वर यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र लिहिले आहे. मुंबईच्या महापौराची रवानगी राणीच्या बागेत एका पिंजऱ्यात अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीवेळी केली होती. 

महापौरांच्या निवासस्थानावरून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडल्या होत्या. महापौर महाडेश्वर यांनी राणीच्या बागेतल्या बंगल्याबद्दल नाराजी व्यक्त करत एकप्रकारे सहमतीच दर्शवली आहे. महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. त्यामुळे राणीची बाग म्हणून परिचित असलेल्या भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात महापौरांचे पर्यायी निवासस्थान करण्यात येणार आहे. यामुळेच महाडेश्‍वर नव्या निवासस्थानावर नाखूष असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करणारे पत्र महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना लिहिले आहे. या पत्रात महापौर महाडेश्वर म्हणतात, राणीच्या बागेत महापौरांचे वास्तव्य योग्य नाही. महापौरांना भेटायला अनेक परदेशी पाहुणे येतात. महापौर निवासस्थानी अनेक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. तसेच राणीचा बाग हे शांतता क्षेत्र असल्याचे सांगत महापौरपदाला शोभेल असा बंगला देण्यात यावी, अशी मागणी महाडेश्वर यांनी या पत्राद्वारे केली आहे. 
 
संबंधित लेख