Memories of Vajpayee By Girish Mahajan | Sarkarnama

अटलजींचा स्वीय सहाय्यक म्हणून मी विमानात फिरलो : गिरीश महाजन 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

आपण सन 1990 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी होतो. त्यावेळी अटलजी छोट्याशा तीन सिटर विमानाने जळगावला आले होते. त्याच विमानात आपण त्यांच्या सोबत गोव- दिव-दमण येथे गेलो होतो. तीन दिवस आपण त्यांच्या सोबत फिरलो. आपण त्यांचा स्विय सहाय्यक म्हणूनच काम केले. ही आठवण आजही आपल्या मनात कायम आहे - गिरीश महाजन

जळगाव : भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अटलजींना भेटण्याचा अनेक वेळा प्रसंग आला. परंतु गोवा दौऱ्यात त्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून तीन दिवस विमानात फिरल्याचा प्रसंग आजही आपल्या मनात कायम आहे, अशी आठवण राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जागवली. 

आपण सन 1990 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी होतो. त्यावेळी अटलजी छोट्याशा तीन सिटर विमानाने जळगावला आले होते. त्याच विमानात आपण त्यांच्या सोबत गोव- दिव-दमण येथे गेलो होतो. तीन दिवस आपण त्यांच्या सोबत फिरलो. आपण त्यांचा स्विय सहाय्यक म्हणूनच काम केले. ही आठवण आजही आपल्या मनात कायम आहे. त्यानंतर आपली अनेक वेळा त्यांच्यशी भेट झाली. खासदार गुणवंतराव सरोदे खासदार असतांना अनेक वेळा दिल्ली येथे त्यांच्या समवेत आपली भेट झाली. मात्र त्यांच्या सोबत त्या लहान विमानात बसलेला तो प्रसंग आजही आपल्या मनात कायम आहे.

संबंधित लेख