Meghana Bordikar plants 150 banyan tree | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

मेघना बोर्डीकरांनी  १५० वडांची झाडे लावून केली  वटपौर्णिमा साजरी 

सरकारनामा
बुधवार, 27 जून 2018

पारंपरिक वटपौर्णिमेबरोबरच मेघना बोर्डीकर यांनी राबवलेल्या या ऊपक्रमाचे ग्रामिण भागातील महिलांनी स्वागत केले . 

परभणी  : भाजपच्या युवा नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून आज ) ग्रामिण भागातील विविध गावांमध्ये वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. वटपौर्णिमेचे औचित्य साधत १५० वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. या झाडांना जगवण्याची शपथ महिलांना देण्यात आली. 

पतीसाठी झगडणाऱ्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून श्रमदान करणाऱ्या आणि कुटुंबासाठी श्रम करणाऱ्या महिलांचा केशर आंब्याचे रोपटे देवून सन्मान करण्यात आला. बोर्डीकर यांच्या या आगळ्या आणि पर्यावरण पुरक वटपौर्णिमेची  चर्चा आज दिवसभर सुरू होती. 

वटपौर्णिमा म्हणजे महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. यादिवशी  महिला वडाची पुजा करतात. या सणाचे औचित्य साधत युवानेत्या मेघना बोर्डीकर यांनी आगळी-वेगळी वटपौर्णिमा साजरी केली. आज सकाळीच त्यांनी ग्रामिण भागातील विविध गावांना भेटी देत त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वडाची झाडे लावण्याची मोहिमच राबवली. 

जिंतूर तालुक्यांतील सावरगाव व जांब ( खु.) येथे प्रत्यक्ष वृक्षारोपन करत महिलांना ही झाडे जगवण्याची शपथ देण्यात आली. तसेच पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदान करणाऱ्या आणि ईतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचाही केशर आंब्याची रोपटे देत सन्मान करण्यात आला. वडाच्या झाडाला प्रदक्षीणा घालण्यापेक्षा त्यांना पाणी घालून ही झाडे वाढवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. 

या प्रसंगी सावरगावच्या सरपंच नंदुबाई मेटकर, उषा ठवले, लिखे, जगताप, आसाराम ठवले जांब खु. येथील विद्या गायकवाड, सरपंच पंडीत जाधव ग्रामसेवक पिंपळकर, आगाम आदिंसह बहुसंख्य महिलांची या प्रसंगी ऊपस्थिती होती. ईतर गावांमध्येही झाडे वाटप आणि वृक्ष संवर्धनाचा हा ऊपक्रम सुरूच राहणार असल्याची माहिती मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.

 

संबंधित लेख