मी संघर्षाला घाबरून मैदान सोडणार नाही : मेघना बोर्डीकर 

मी संघर्षाला घाबरून मैदान सोडणार नाही, येत्या चार - पाच दिवसात आपण आपला निर्णय घोषित करणार-मेघना बोर्डीकर
Meghna Bordikar
Meghna Bordikar

परभणी :  मी बोर्डीकरांची मुलगी असले तरी मला राजकारण सुकर नाही. माझा राजकीय प्रवास बिकट राहिलेला आहे. विरोधकांसोबतच स्वपक्षीयांशी देखील माझा संघर्ष आहे. परंतू मी संघर्षाला घाबरून मैदान सोडणार नाही, येत्या चार - पाच दिवसात आपण आपला निर्णय घोषित करणार आहे असे प्रतिपादन भाजपनेत्या मेघना बोर्डीकर यांनी सोमवारी (18) केले.

भाजप नेत्या मेघना बोर्डीकर - साकोरे या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक आहेत. युती होण्या आधी त्या भाजपकडून संभाव्य उमेदवार होत्या. परंतू युती झाली आणि मेघना बोर्डीकरांसमोर प्रश्न उभा राहिला. युती झाल्यानंतर राज्यातून पहिल्यांदा मेघना बोर्डीकर यांनी आपण निवडणुक लढविणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर मेघना बोर्डीकर या सातत्याने चर्चेत आहेत. 

परभणी लोकसभा मतदार संघ हा युतीमध्ये शिवसेनेच्या पारड्यात आहे. परंतू मेघना यांची निवडणुक लढविण्याची प्रचंड इच्छाशक्ती व कार्यकत्याचा जोष पाहून त्यांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. निवडणुक लढवायची की नाही या बाबतचा निर्णय मेघना बोर्डीकर सोमवारी घेणार होत्या. त्यासाठी त्यांनी शहरात समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला चांगला प्रतिसाद ही मिळाला. विशेष म्हणजे बैठकीत व्यासपीठावर भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मेघना बोर्डीकर म्हणाल्या, "बोर्डीकर नावाच्या ताकदीवर माझा प्रवास होत आलेला आहे. मी कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी राहत आहे. गेल्या आठ वर्षापासून मी समाजकारण करत आले आहे. परंतू आपण निर्णय प्रक्रियेत असावे यासाठी मी लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणुकीसंदर्भात कार्य निर्णय घ्यावा यासाठी वरिष्ठ सहकारी, कार्यकर्ते व राजकीय सल्लागारांचे मार्गदर्शन घेवून येत्या चार - पाच दिवसात मी  निर्णय घेईन ," असे ही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com