युतीला पहिला खडा परभणीत; मेघना बोर्डीकर लढणारच!

युतीला पहिला खडा परभणीत; मेघना बोर्डीकर लढणारच!

परभणी : 'लोकांच्या मनात होते भाजप- शिवसेनेची युती व्हावी, ती झाली. आता परभणी लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या मनात आहे की, मी निवडणुक लढवावी. त्यामुळे लोकभावनेचा आदर करीत मला निर्णय घ्यावा लागेल' असे  भाजप नेत्या मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत युतीची घोषणा झाल्यानंतर परभणीतून प्रतिक्रिया आली आहे. परभणीच्या जागेवर शिवसेनेचा खासदार असताना मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी लढण्याची भुमिका घेतली आहे. 

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर परभणी जिल्ह्यातील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना साकोरे या देखील भाजपमध्ये गेल्या. मेघना यांच्यासमोर लक्ष होते परभणी लोकसभा निवडणुक लढविण्याचे. गेल्या साडेचार वर्षात त्यांनी संपूर्ण मतदार संघाचा दौरा केला. 2019 मध्ये युती होणार नाही, या आशेवर मेघना यांनी तयारी केली होती.  

या संदर्भात विचारल्यावर त्या म्हणाल्या की, ''ती लोकांची मागणी होती. लोकभावनाचा आदर करून युती करावी लागली. तसाच मी लोकसभा निवडणुक लढवावी ही परभणी मतदारसंघातील लोकांची इच्छा आहे. सकाळपासून मला फोन सुरु झाले आहेत की, ताई आता माघार नको. त्यामुळे लोकभावनेचा आदर करून मला काही तरी निर्णय घ्यावा लागेल.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com