medha patkar about late patangrao kadam | Sarkarnama

पतंगरावांनी पुनर्वसनाचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळला : मेधा पाटकर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

साखर आणि लिकर्स कारखान्यांना भरमसाठ पाणी दिले जात आहे. तीन टक्के जमिनीवरच्या उसाला साठ टक्के पाणी लागत आहे. जलतज्ज्ञांनी यासंदर्भात अनेक पर्याय मांडले परंतू पूर्वीपासूनच राजकर्ते मोठ्या धरणांच्या पाठीमागे लागल्याने त्याचा उपयोग झाला नाही. राजकारण आणि घोटाळे हे समीकरण बनल्याचे अनेकदासमोर आले असून विकास योजना भ्रष्टाचाराचे खाद्य झाले आहे. राजकीय नेते भागीदार बनतात तेव्हा विकासाचे भान सुटते.

-मेधा पाटकर 

ढेबेवाडी (सातारा) : दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी मराठवाडीच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा संवेदनशीलपणे उचलून धरला होता. राजकारणी हे जनप्रतिनीधी असतात, त्यांनी वेगळ्या पद्दतीने असे प्रश्न हाताळले पाहिजेत, असे मत नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. 

मराठवाडी प्रकल्पग्रस्तांच्या एका कार्यक्रमात जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी लढ्यात तयार झालेले नेतृत्व राजकीय प्रकियेत आले पाहिजे, असे लोकप्रतिनीधीच जनतेला न्याय देवू शकतील असे वक्तव्य केले होते.

त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना मेधा पाटकर म्हणाल्या,' प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न संवादातूनच सुटू शकतात, त्यामुळे राजकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेचा प्रकल्पग्रस्तांशी संवाद वाढला पाहिजे, असा संवाद कधीही वाया जात नाही. त्यामुळे कुणाची प्रतिष्ठाही दुखावत नाही. काही संवेदनशील राजकारणी ही बाब नेमकेपणाने ओळखून पावले टाकत आहेत. त्यामध्ये विजय शिवतारे यांचा उल्लेख करावा लागेल. तत्पूर्वी दिवंगत नेते पतंगराव कदम यांनीही मराठवाडीच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा संवेदनशीलपणे उचलून धरला होता. राजकारणी हे जनप्रतिनीधी असतात त्यांनी वेगळ्या पद्दतीने असे प्रश्न हाताळले पाहिजेत. वांग मराठवाडीच्या लढ्यात आम्ही पुर्वीपासूनच चांगल्या सुपिक जमिनींसाठी आग्रही होतो. मात्र तशा जमिनी न मिळाल्याने त्या खरेदीसाठी पैसे स्विकारण्याचा मार्ग अवलंबावा लागला. यामध्ये लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आम्ही दोष देणार नाही, त्यांच्या समोरही दुष्काळ, कर्ज, सिंचनाची अशाश्वती असे प्रश्न आहेत. सरकारने धरणग्रस्तांना बरोबर घेऊन चांगल्या प्रतीच्या जमिनी खरेदी केल्या असत्या तर पैसे देण्याचीही गरज भासली नसती. 

संबंधित लेख