medha kulkarni doctorate | Sarkarnama

 आमदार, प्राचार्य मेधा कुलकर्णी आता होणार डॉक्‍टरेट 

उमेश घोंगडे 
बुधवार, 7 मार्च 2018

पुणे : पुण्यातील कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी पुण्यातील प्रख्यात सेवासदन सोसायटीच्या अध्यापिका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. बढती मिळाल्याने नुकत्याच त्या या महाविद्यायाच्या प्राचार्य झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम एवढ्यावरच न थांबता संशोधनाच्या पातळीवर गेले आहे.

आमदार म्हणून जबाबदारी पार पाडत असताना आता त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "पीएचडी'साठी संशोधनाला सुरवात केली आहे. 

पुणे विद्यापीठात "पीएचडी'साठी प्रवेश मिळविणे हे मोठे जिकरीचे काम मानले जाते. आमदार कुलकर्णी यांनी त्यात यश मिळविले असून संशोधनाच्या कामाला सुरवातदेखील केली आहे. आमदार म्हणून जबाबदारी पार पाडताना वेळ काढून लवकरात लवकर संशोधनाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार आमदार कुलकर्णी यांनी केला आहे.

पुण्यातील सर्वात जुन्या अध्यापिका विद्यालयापैकी एक असलेल्या सेवासदन सोसायटीच्या अध्यापिका विद्यालयात 1995 साली आमदार कुलकर्णी या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. 

विज्ञान विषयाची अध्यापन पद्धती या विषयात त्या अध्यापन करतात. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना 2002 च्या महापालिका निवडणुकीत त्यांना राजकीय क्षेत्रात संधी मिळाली.

कोथरूडमधून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून 2002 त्यानंतर 2007 व 2012 अशा तिन्ही वेळा निवडून आल्या. 2014 साली झालेल्या विधानसाभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून गेल्या. आमदार म्हणून काम करताना राज्य पातळीवरील राजभाषा समितीच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली आहे. राजकारणाचा व्याप सांभाळून लवकरात लवकर संशोधनाचे काम पूर्ण करण्याचा आपला प्रयतन राहील, असे आमदार कुलकर्णी यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

संबंधित लेख