medha kulkarni diwali celebration | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

आमदार मेधा कुलकर्णींची दिवाळीतील खासियत ओल्या नारळाच्या करंज्या!

ज्ञानेश सावंत
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी या व्यस्त राजकीय वेळापत्रकातून सध्या आपल्या घरी दिवाळीचा फराळ करण्याचा आनंद घेत आहेत. आपल्याकडील पाककलेचे कौशल्य अजमावताना त्या किचनमध्ये रमल्या. तेव्हा, चकल्या, करंजी, लाडू असे खास पदार्थ तयार केले. यानिमित्ताने आमदार कुलकर्णी यांच्यातील गृहिणीही दिसून आली. साजूक तुपातील खुमासदार ओल्या नारळाच्या करंज्या तयार करण्याची त्यांची खासियत आहे.

कुलकर्णी या ऐन दिवाळीतही त्या रोज डझनभर कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. कार्यक्रमांतून वेळ मिळेल, तेव्हा तो किचनमध्ये घालवत आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या मंडळींनाही त्या आर्वजून फराळाचा आस्वाद घेण्याचा आग्रह करतात. त्यांना करंजी आवडते. त्यांच्या हाताच्या करंज्यांची चव निराळीच असल्याने पती विश्राम यांच्यासह मुलगा आणि मुलीला करंज्यांची चव हवीहवीशी झाली. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीत कुलकर्णी यांनीच करंज्या करण्याचा आग्रह त्यांच्या कुटुंबियांचा असतो.

करंज्यासाठी सारण, पीठ तयार करण्यासोबत त्या स्वत:च तळण्याचेही काम करतात. चकल्या करण्यासाठीही त्या वेळ काढतात. त्यामुळे कुलकर्णी यांच्यातील घरातील फराळ म्हणजे पाहुण्यांकरिता मेजवानीच असते. दिवाळीनिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमांतून आमदार कुलकर्णी बुधवारी दुपारी थोड्याशा मोकळ्या झाल्या आणि त्यांनी किचनमध्ये जाऊन करंज्यांचे काम हाती घेतले.
 
कुलकर्णी म्हणाल्या, ""दिवाळीत घरी वेगवेगळे पदार्थ केले जातात. मी केलेल्या कारंज्या कुटुंबियांना आवडतात. त्यामुळे त्या करण्याची जबाबदारी माझ्याकडे असते. ती मी उत्साहाने पार पाडते. खरे तर कारंज्या मलाही आवडतात. अन्य पदार्थांनाही माझी पसंती असते. कारंज्यासह काही पदार्थ करण्यासाठी मला दोन-चार दिवस आधीच तयारी करावी लागते. मात्र, तितका वेळ मिळत नाही.'' 
 
संबंधित लेख