Medha Gadgil Couldn't Became Chief Secretary Again | Sarkarnama

मेधा गाडगीळांच्या नावावर फुली; मुख्य सचीवपद पुन्हा हुकले 

उमेश घोंगडे 
शनिवार, 11 मे 2019

प्रशासकीय सेवेत वरिष्ठ असलेल्या मेधा गाडगीळ यांना राज्याच्या मुख्य सचिव होण्यापासून राज्य सरकारने तिसऱ्यांदा टाळल्याने राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याची गाडगीळ यांची संधी गेली आहे. राज्य सरकारने मोठे प्रशासकीय बदल आज केले. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात राज्याला तीन मुख्य सचिव लाभले. राज्याच्या प्रशासनाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली असावी, असे बोलले जात आहे. 

पुणे : प्रशासकीय सेवेत वरिष्ठ असलेल्या मेधा गाडगीळ यांना राज्याच्या मुख्य सचिव होण्यापासून राज्य सरकारने तिसऱ्यांदा टाळल्याने राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याची गाडगीळ यांची संधी गेली आहे. राज्य सरकारने मोठे प्रशासकीय बदल आज केले. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात राज्याला तीन मुख्य सचिव लाभले. राज्याच्या प्रशासनाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली असावी, असे बोलले जात आहे. 

विशेष म्हणजे या सरकारच्या काळात गेल्या साडेचार वर्षात महिला आधिकाऱ्याला टाळण्यात तर आलेच शिवाय एकाही मराठी आधिकाऱ्याला मुख्य सविचपदाची संधी देण्यात आली नाही. मेधा गाडगीळ या कॉंग्रेसचे आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या पत्नी आहेत. या कारणामुळे गाडगीळ यांना टाळण्यात येत आहे की काय, या प्रकारची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्यावर्षी डी. के. जैन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. त्यावेळीदेखील गाडगीळ यांना टाळण्यात आले. जैन यांच्या निवृतीतंनतर एप्रिल महिन्याच्या सुरवातीला यूपीएस मदान यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी देखील गाडगीळ यांना टाळण्यात आले. 

मदान यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आज मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. गाडगीळ या 1983 च्या तुकडीच्या आयएएस आहेत तर मेहता हे 1984 च्या तुकडीचे आयएएस आहेत. सेवेत वरिष्ठ असतानाही गाडगीळ यांना टाळण्यात आल्याची प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या साऱ्या राजकारणाला कंटाळून गाडगीळ या गेले काही महिने रजेवर होत्या. पंधरा दिवसांपूर्वी त्या पुन्हा रूजू झाल्या आहेत. सध्या त्या सामान्य प्रशासन विभागात अतिरक्त मुख्य सचिच आहेत. येत्या ऑगस्टमध्ये त्या निवृत्त होणार आहेत. 

संबंधित लेख