medha and maratha kranti morcha | Sarkarnama

आरक्षणाच्या मागणीसाठी मेढयात युवक चढले इमारतीवर, आत्महत्येचा इशारा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

सातारा : जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्री चर्चेला आल्याशिवाय इमारतीवरून खाली उरणार नाही, अशी भूमिका घेऊन मेढ्यातील मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात सहभागी पाच युवक तेथील तीन मजली इमारतीवर चढले आहेत. आमच्या आंदोलनाकडे दूर्लक्ष केल्यास आम्ही या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिला आहे. याप्रकारामुळे मेढ्यातील आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सध्या राज्यभर विविध प्रकारे आंदोलने सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी जावली तालुक्‍यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. मेढ्यात सर्व बाजारपेठ बंद ठेऊन आंदोलकांनी मोर्चा काढला. दरम्यान, या आंदोलनातील पाच युवक मेढा बाजारपेठेतील तीन मजली इमारतीवर चढून बसले असून आमचे म्हणणे ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा मुख्यमंत्री आल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही, अशी भुमिका या पाच युवकांनी घेतली आहे. तसेच कोणीही आले नाही तर आम्ही वरून उडी टाकून आत्महत्या करू, असा इशाराही या पाच युवकांनी दिला आहे. घटनास्थळी तहसीलदार रोहिणी आखाडे उपस्थित असून यापैकी चार युवकांची नावे अरूण जवळ, गणेश जवळ, सचिन करंजेकर, प्रविण पवार, अशी असून आणखी एका युवकाचा समावेश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख