परदेशातील नोकरी सो़डून बनला आयएएस अधिकारी! मयूर काथवटेची प्रेरक कहाणी

परदेशातील नोकरी सो़डून बनला आयएएस अधिकारी! मयूर काथवटेची प्रेरक कहाणी

वालचंदनगर : पुण्यातील मयूर अशोक काथवटे युवकाने देशाच्या विकासासाठी व जनतेच्या सेवेसाठी दुबईमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीला रामराम खरून देशामध्ये परत येण्याचा निर्णय घेतला.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशात 96 वा व राज्यात 9 वा क्रंमाक मिळवून देशामध्ये आयएएस अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. 

इंदापूर तालुक्याचे गटशिक्षणधिकारी अशोक काथवटे यांचा मयूर हा मुलगा आहे. मयूरचे सातवीपर्यंत शिक्षण बीड जिल्हातील ग्रामीण भागामध्ये झाले. सुरवातीपासुन ग्रामीण भागाची आवड होती. नंतर वडिल नोकरीसाठी पुण्यातमध्ये आल्यानंतर पुढील शिक्षण पुण्यातच पुर्ण केले. बारावीमध्ये असतानाच आयआयटी परीक्षा उर्तीण झाल्यानंतर मुंबईच्या पवई कॉलेमधून बीटेक ची पदवी प्राप्त केली.

2015 मध्ये एका कॅबच्या खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. 2016 मध्ये दुबईमधील नामांकित बॅंकेमध्ये अडीच लाख रुपयांच्या पगाराची नोकरी मिळाली. मात्र विदेशातील पैसा मिळूनही मन शांत राहत नव्हते. देशासाठी काहीतरी करण्याचे विचार सतत मनामध्ये विचार येत असल्याने डिसेंबर 2016 अखेर लठ्ठ पगारच्या नोकरीचा राजीनामा देवून भारतामध्ये पुन्हा प्रवेश केला. पुण्यामध्ये राहून स्पर्धापरीक्षेची तयार सुरु केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2017 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये उज्वल यश मिळून महाराष्ट्रामध्ये नववा क्रंमाक पटकावला आहे. मयूरचे समाजातील सर्व नागरिकामधून अभिनंदन होत आहे.

यासंदर्भात मयूर याने सांगितले की, दुबई मध्ये अडीच लाख रुपयांच्या पगाराची नोकरी होती.खर्चवजा जाता दोन लाख रुपये शिल्लक राहत होते. मात्र आयुष्यात पैशापेक्षा जनसेवला महत्व देणार आहेत. आपल्या देशातील प्रगतीसाठी, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी काम करायाचे असल्याने परदेशातील नोकरीला रामराम ठोकला.परदेशाच्या तुलनेमध्ये पैसे कमी मिळणार असले तरीही देशात काम करीत असल्याचे समाधान जास्त मिळेल असे सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com