Mayor will have to become proactive for development | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

अकोला :हद्दवाढीतील गावांसाठी नव्या महापाैरांना व्हावे लागेल भगिरथ

सरकारनामा ब्युराे
शनिवार, 11 मार्च 2017

अकोला:  पंधरा वर्षांनंतर महापालिकेची झालेली हद्दवाढ कुणाच्या पथ्यावर पडणार हा निवडणुकीच्या काळात सर्वांच्याच चर्चेचा विषय हाेता. शिवसेना अाणि भारिप बमसंचे प्राबल्य असलेल्या हद्दवाढीतील चाेवीस गावात भाजपने जाेरात मुसंडी मारली.

हद्दवाढीने प्रभावित वीस जागांपैकी साेळा जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून अालेत. त्यामुळे या गावांच्या परिसराच्या विकास हे नवनिर्वाचित महापाैरांपुढील सर्वांत माेठे अाव्हान राहील. मुलभुत सुविधांपासून वंचीत असलेल्या या परिसरात विकासाची गंगा पाेहचविण्यासाठी नव्या महापाैरांना भगिरथ व्हावे लागणार अाहे. 

अकोला महापालिकेत एेंशी पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळविली. महापाैर आणि उपमहापाैरपदही त्यांच्याचकडे आहे. पुढे स्थायी समिती सभापतीपदही त्यांच्याचकडे येईल. त्यामुळे निर्णय घेताना कोणतीही आडकाठी आता सत्ताधारी भाजपला राहणार नाही. त्यामुळे विकास झाला नाही म्हणून कोणतेही कारण सांगण्यासाठी शिल्लक राहिले नाही. अकोला शहराच्या विकासाबाबत भाजपचेच लोकप्रतिनिधी वारंवार विविध व्यासपीठांवरून आवाज उठवत होते. तेव्हा केंद्रात, राज्यात अाणि महापालिकेतही सत्ता नसल्याचे कारण होते. आता तेही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे महापाैरांना विकास हा करून दाखवावाच लागेल.

 नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासोबतच ठोस विकासाची कामे करून दाखविण्याचे आव्हान त्यांना येणाऱ्या काळात पेलावे लागेल. यात सर्वांत मोठे आव्हान त्यांच्यापुढे असेल ते वर्षांनुवर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या नवीन वस्त्या व ग्रामपंचायतत्या हद्दीतील परिसर. हद्दवाढीने महापालिकेच्या क्षेत्रात आलेल्या या परिसराचे पालकत्वच महापाैरांकडे आले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत काळात महापालिकेची एकहाती सत्ता दिल्यास हद्दवाढीतील गावांचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू, अशी अाश्वासने भाजपच्या खासदार, अामदारांनी दिली हाेती.

 निवडणुकीपुर्वीच त्यादृष्टीने पावले टाकत हद्दवाढीतील गावांच्या मुलभुत सुविधांचा मास्टर प्लॅन तयार करून शासनाकडे पाठपुरावाही सुरू केला हाेता. भाजपच्या विकासाच्या अाश्वासाला प्रतिसाद देत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या पदरात भरभरून मते टाकल्यामुळे विकासाची गंगा या परिसरापर्यंत घेवून जाणारा भगिरथ महापाैर विजय अग्रवाल यांना व्हावे लागणार अाहे. या परिसरातील रस्ते, पथदिवे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, सांडपाणी व्यवस्थापन आणि महापालिकेर्फे पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधा येथील नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. 
 
संबंधित लेख