Mayor Nandkumar Ghodele gives challenge to MLA Imtiaz Jaleel | Sarkarnama

इम्तियाज जलील यांनी नौटंकी बंद करून भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवावा :नंदकुमार घोडेले

जगदीश पानसरे 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

भ्रष्टाचाराचे आरोप करत इम्तियाज नुसतीच नौटंकी करतात अशी टिका महापौरांनी केली होती. त्यावर बुधवारी 'तुम्ही भ्रष्टाचार बंद करा, मी नौटंकी बंद करतो' अशा भाषेत इम्तियाज जलील यांनी महापौरांना डिवचले होते. 

औरंगाबादः "उठसूठ महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी एकतरी भ्रष्टाचार सिध्द करून दाखवावा," असे आव्हान शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहे. 

स्मार्ट सिटी योजनेतून शहर बस खरेदी करताना फक्त टाटा कंपनीलाच कंत्राट मिळावे म्हणून महापालिकेने प्रयत्न केल्याचा आरोप करत यात भ्रष्टाचार झाल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी बुधवारी केला होता. त्याला महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता. दोन) एमआयएमच्या आमदारांनी एखादा तरी भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान दिले. 

महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपवर आमदार इम्तियाज जलील यांनी नेहमीच प्रश्‍नचिन्ह उभारात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. समांतर, एलईडी, कचरा आदी विषयावर विधीमंडळात देखील त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. 

वारंवार होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना वैतागलेल्या महापौरांनी " ते नौंटकी करतात' असा टोला लगावला होता. आमदार जलील हे तज्ज्ञ आहेत का? असा सवाल करत बस खरेदीसाठी ज्या अटी आहेत, त्यात प्रशासनाने काही गडबड केली असेल तर त्यांनी त्या समोर आणून द्याव्यात. प्री-बीडच्या वेळी इतर कंपन्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे. आमदारांनी पुरावे सादर करून आरोप करावेत. ते सिद्धही करावे . जेणेकरून महापालिकेचा फायदा होईल असा चिमटा देखील महापौर घाेडेले यांनी काढला.

संबंधित लेख