Mayor Conference Says Don's Appoint Tukaram Mundhe | Sarkarnama

राज्यातील महापौर म्हणतात....तुकाराम मुंढे नको रे बाप्पा! 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

'तुकाराम मुंढे हुकुमशाही कारभार करतात. लोकप्रतिनिधींना डावलतात. स्वतःच सर्व निर्णय घेतात. ही पध्दत लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे नाशिकच काय राज्यातील कोणत्याही महापालिकेत त्यांची नियुक्ती नको,' अशी मागणी नागपुर येथे सुरु असलेल्या एकोणीसाव्या महापौर परिषदेत करण्यात आली. 

नाशिक : 'तुकाराम मुंढे हुकुमशाही कारभार करतात. लोकप्रतिनिधींना डावलतात. स्वतःच सर्व निर्णय घेतात. ही पध्दत लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे नाशिकच काय राज्यातील कोणत्याही महापालिकेत त्यांची नियुक्ती नको,' अशी मागणी नागपुर येथे सुरु असलेल्या एकोणीसाव्या महापौर परिषदेत करण्यात आली. 

मुंबईचे महापौर तथा महापौर परिषदेचे अध्यक्ष विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी लगोलग तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले. त्यामुळे नागपुरची महापौर परिषद चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी परिषदेत प्रमुख पाहुणे होते. यावेळी संतप्त महापौर रंजना भानसी यांनी नाशिक महापालिकेतील आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाविषयी आलेले अनुभव कथन केले.

नगरसेवकांना निधी नसल्याने किरकोळ कामे देखील करता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, असे त्यांनी सांगितले. असाच अनुभव पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, पनवेलच्या महापौरांनी सांगितला. आयुक्त मुंढे यांच्या कामकाजातून होणारा त्रास व आलेले अनुभव कथन केले. हे लोकशाहीला घातक असल्याचे सांगितले. 

महापौर परिषदेत या महापौरांचे अनुभव ऐकल्यावर अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी याविषयी मुख्यमंत्र्यांकडे ठराव द्यावा अशी सुचना केली. त्यानंतर परिषदेचे अध्यक्ष तथा मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी तुकाराम मुंढे यांची कुठल्याचं महापालिकेत नियुक्ती करू नये, अशी मागणी करणारा ठराव मुख्यमंत्र्यांकडे दिला. 

संबंधित लेख