तुमच्या घरी लक्ष्मी राहू दे, आणि महापालिकेच्या तिजोरीतही येऊ दे - महापौर घोडेले

तुमच्या घरी लक्ष्मी राहू दे, आणि महापालिकेच्या तिजोरीतही येऊ दे - महापौर घोडेले

औरंगाबाद : ऐन दिवाळीत शहरात पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे, कचऱ्याचा प्रश्‍न सोडवण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश आले, पण एवढ्याने जनतेचे समाधान होणार नाही याची मला जाणीव आहे. सणासुदीत नागरिकांना पुरेसे पाणी मिळू नये ही निश्‍चितच चांगली गोष्ट नाही मात्र त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण येत्या वर्षात हे सगळे प्रश्‍न मार्गी लागतील असा शब्द देतांनाच " महापालिकेच्या तिजोरीत लक्ष्मी नांदो आणि शहराची भरभराट होवो ' अशा शब्दांत शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी औरंगाबादकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. "सरकारनामा' शी बोलताना त्यांनी विविध प्रश्‍नांना मनमोकळी उत्तरे दिली . 

कचरा आणि पाणी प्रश्‍नामुळे अनेक दिवस ताण-तणावात गेले. कचऱ्याचा प्रश्‍नाबाबत मी समाधानी आहे, पण पाण्याचे नियोजन मात्र कोलमडले हे मी कबुल करतो. दिवाळी सारख्या महत्वाच्या सणात लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते हे माझ्यासाठी व महापालिकेसाठी निश्‍चितच भूषणावह नाही. पण यातून मार्ग काढण्यासाठी मी व माझे सहकारी शर्थीचे प्रयत्न करतोय असेही त्यांनी सांगितले. 

महापौरपदाची जबाबदारी हाती घेतली तेव्हापासून शहरातील नागरिकांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. त्याला पात्र ठरण्याचा मी आटोकाट प्रयत्न देखील केला, पण कचरा आणि पाणी प्रश्‍नामुळे वैयक्तिक मी समाधानी नाही. स्मार्टसिटी, रस्ते आणि शहर बससेवा हे एकमेकांना पूरक असे प्रश्‍न आपण धसास लावले आहेत. येत्या वीस तारखेपर्यंत सिटीबस धावायला लागतील. पाण्याचा प्रश्‍न येणाऱ्या नवीन वर्षात भेडसावणार नाही हा शब्द मी शहरवासियांना देतोय. अडचणीच्या काळात देखील माझ्यावर लोकांनी विश्‍वास दाखवला, त्याला तडा जाऊ देणार नाही याचा पुनरूच्चार देखील घोडेले यांनी केला. 

दिवाळीनंतर " घर तिथे कर ' अभियान राबवणार 
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यातून शहरातील विकासकामे झपाट्याने करता यावी यासाठी दिवाळी नंतर "घर तिथे कर' मोहिम राबवणार असल्याचेही घोडेले यांनी सांगितले. "आधी तुमच्या घरी लक्ष्मी नांदो, मग माझ्या घरी' असे म्हणत त्यांनी पुनश्‍च नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com