mayawati and congress | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

महाराष्ट्रात कॉंग्रेसबरोबर युतीचे बसपाचे संकेत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

नागपूर : छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये बहुजन समाज पार्टीने कॉंग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. या निर्णयाचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, असे वाटत असताना बसपा प्रमुख मायावती यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचे सुतोवाच केले आहे. 

नागपूर : छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये बहुजन समाज पार्टीने कॉंग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. या निर्णयाचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, असे वाटत असताना बसपा प्रमुख मायावती यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचे सुतोवाच केले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून बसपाला सोबत घेऊन कॉंग्रेसने राजकीय डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये काही मतदारसंघांमध्ये बसपाचा प्रभाव आहे. यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी कॉंग्रेसने बसपासोबत आघाडी करण्यासाठी हात पुढे केला होता. परंतु मायावतींनी कॉंग्रेसला झिडकारून "अकेले' लढण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेसला जबर झटका बसला. 

बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी महाराष्ट्राबाबत बसपाची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. विदर्भ व मराठाडवाड्यातील काही मतदारसंघात बसपाचा प्रभाव आहे. विदर्भातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये बसपाचे उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. हे गणित लक्षात घेऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील झाल्यास बसपाचे महाराष्ट्र विधानसभेत खाते उघडू शकते, अशी आशा बसपाच्या नेत्यांना आहे. 

लोकसभा उमेदवारीसाठी बसपा फारसा आग्रह धरणार नाही. या बदल्यात विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळविण्यासाठी बसपा इच्छुक आहे. ही शक्‍यता लक्षात घेऊन बसपाच्या नेत्यांनी राज्यात कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव मायावतींना पाठविला आहे. या प्रस्तावानुसार मायावतींनी महाराष्ट्रात कॉंग्रेससोबत आघाडी करण्यास हरकत नसल्याचे संकेत दिल्याचे साखरे यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख