maval-shirur-loksabha-election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

मावळ, शिरूरमध्ये युतीची 'आघाडी'वर आघाडी

उत्तम कुटे
सोमवार, 11 मार्च 2019

रविवारी लोकसभा निवडणूक जाहीर झाली. मात्र, मावळ आणि शिरूरचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे व त्यातही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार जवळपास नक्की झाले आहेत. त्यामुळे किमान या आघाडीवर युतीने आघाडीवर `आघाडी' घेतली आहे.

पिंपरी: रविवारी लोकसभा निवडणूक जाहीर झाली. मात्र, मावळ आणि शिरूरचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे व त्यातही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार जवळपास नक्की झाले आहेत. त्यामुळे किमान या आघाडीवर युतीने आघाडीवर `आघाडी' घेतली आहे.

युतीत वरील दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. तेथे त्यांचे खासदार आहेत. तेच पुन्हा रिंगणात राहणार असल्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्ष प्रचार सुरूही केला आहे. भाजपला टाळीसाठी त्यांनी हात सुद्धा पुढे केला आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादीकडून या दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची अजून चाचपणीच सुरू आहे. गेल्यावेळीही असेच घडले होते. त्याचा फटका बसला होता. त्यामुळे यावेळी, तरी उमेदवार लवकर देण्याची कार्यकर्त्यांची मागणी होती व आहे. मात्र ते अद्याप निश्चितच न झाल्याने कार्यकर्ते गोंधळलेले आहेत. कधी एक, तर कधी दुसरेच नाव पुढे येत असल्याने तयारी सुरू केलेले इच्छूक व त्यांचे हितचिंतकही धास्तावलेले आहेत.आता उमेदवारीचे काय आणि कोणते सरप्राईज येते वा भेटते याकडे त्यांचेच नाही तर सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख