मावळात भाजप, राष्ट्रवादीला प्रत्येकी पाच; तर शिवसेनेला दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व

ग्रामपंचायती - विजयी सरपंच पुढीलप्रमाणे इंदोरी: सरपंच : कीर्ती सुनील पडवळ (बिनविरोध)निगडे : सरपंच : सविता बबुशा भांगरेगोडुंब्रे : सरपंच : सागर बाळू सावंतसावळा - सरपंच : नामदेव मारुती गोंटेभोयरे : सरपंच : बळिराम राणू भोईरकरवरसोली : सरपंच: सारिका संजय खांडेभराड शिरगाव : सरपंच : मंगल सुरेश गोपाळेकुणे नामा : सरपंच : संदीप वसंत उंबरे
मावळात भाजप, राष्ट्रवादीला  प्रत्येकी पाच; तर शिवसेनेला दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व

वडगाव मावळ  :  मावळ तालुक्‍यात झालेल्या नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसला संमिश्र यश मिळाले. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी पाच, तर शिवसेनेने दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्वाचा दावा केला आहे. 

निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी व भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. 

मावळ तालुक्‍यातील इंदोरी, निगडे, गोडुंब्रे, शिरगाव, देवले, वरसोली, भोयरे, सावळा व कुणे नामा या नऊ ग्रामपंचायतीच्या 81 जागांपैकी 36 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 45 जागांसाठी तसेच इंदोरी वगळता इतर आठ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सोमवारी मतदान झाले. त्याची मतमोजणी मंगळवारी येथील महसूल भवनात तहसीलदार रणजित देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. सुमारे दीड तासात संपूर्ण निकाल जाहीर झाले. 

भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बळिराम भोईरकर यांनी अवघ्या तीन मतांनी विजय मिळवला. इंदोरी येथे बाळकृष्ण पानसरे यांनी गावकीने दिलेल्या उमेदवारावर मात करत विजय संपादन केला. येथे भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने समझोता करून सोळा जागा बिनविरोध केल्या आहेत. सुरवातीचे अडीच वर्षे भाजपचा सरपंच व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उपसरपंच व त्यानंतरच्या अडीच वर्षांत राष्ट्रवादीचा सरपंच व भाजपचा उपसरपंच, असा फॉर्म्युला या दोन्ही पक्षांनी ठरवला आहे. 

भाजप, राष्ट्रवादीचा दावा 
आमदार बाळा भेगडे व तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी भाजपने इंदोरी, शिरगाव, सावळा, देवले व कुणे नामा या पाच ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला. शिरगाव व सावळा या ग्रामपंचायती पक्षाने प्रथमच ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे सुमारे 43 सदस्य निवडून आल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्‍वास दाखवल्याची प्रतिक्रिया आमदार भेगडे यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही भोयरे, निगडे, गोडुंब्रे, वरसोली व देवले या पाच ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी केला आहे. नऊ ग्रामपंचायतींमध्ये पक्षाचे 44 सदस्य निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्‍याच्या ग्रामीण भागात पक्षाची ताकद कायम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

देवले व शिरगाव या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी विजयी झालेले उमेदवार हे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी केला आहे. इतर ग्रामपंचायतींमध्येही पक्षाचे अनेक सदस्य विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा पक्षीय नेते करत असले, तरी काही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पॅनेलने विजय मिळवल्याचा दावा पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com