मौदा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती सोमनाथे 

मौदा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती सोमनाथे 

नागपूर ः नागपूर जिल्ह्यातील मौदा नगराध्यक्षपदी भारती सोमनाथे केवळ 128 मतांनी निवडून आल्या. त्यांनी कॉंग्रेसच्या रोशनी निनावे यांचा पराभव केला. 

मौदा नगरपरिषद ही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे या नगरपरिषदेची निवडणूक बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसनेही जोरदार फिल्डिंग लावली होती. परंतु कॉंग्रेसच्या रोशनी निनावे यांना केवळ 128 मतांनी पराभव पचवावा लागला. एकूण 17 सदस्य असलेल्या या नगरपरिषदेत भाजपचे 8 सदस्य निवडून आले आहेत. 

कॉंग्रेसने 5, शिवसेना 2 व 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले. नागपूर जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक व आमदार सुनील केदार यांनी या निवडणुकीत एकत्रितपणे प्रचार केला परंतु पालकमंत्री बावनकुळे यांनी या दोन्ही नेत्यांनी डाळ शिजू दिली नाही. कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका कॉंग्रेसला बसला. कॉंग्रेसच्या दोन उमेदवारांनी बंडखोरी केली होती. 

या बंडखोरीमुळे भाजपच्या पारड्यात ही नगर परिषद गेल्याचे बोलले जात आहे. या नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. परंतु शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे केवळ 2 सदस्य निवडून आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com