matin and aurangabad corporation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

एमआयएम नगरसेवक मतीन यांना पुन्हा प्रवेश नाकारला

माधव इतबारे
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना पुन्हा एकदा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रवेश नाकारण्यात आला. भाजप नगरसेवकांनी त्यांना प्रवेश देण्यास कडाडून विरोध केला तर त्यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात यावी या मागणीसाठी एमआयएम नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर महापौरांनी सुमारे पंधरा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. 

शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठा व मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसंदर्भात महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे गुरुवारी (ता.एक) आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बद्दल अपमानास्पद वक्‍यव्य करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना सर्वसाधारण सभेत प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी केली. 

त्यावर एमआयएम, कॉंग्रेस नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मतीन यांना सभागृहात मारहाण झाली होती. ज्या सदस्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र महापौरांनी मतीन यांना प्रवेश न देण्याचा निर्णय कायम ठेवल्याने एमआयआय नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सुमारे 15 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. 

खुर्च्यांची तोडफोड 
सदस्यत्व रद्द केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या नगरसेवकाने खुर्च्यांची तोडफोड केली. त्यामुळे सभागृहाबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

संबंधित लेख