Mathadi Leadr Ex Mla Narendra Patil Resigns from NCP | Sarkarnama

माथाडी नेते व माजी आमदार नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादीचा राजिनामा - भाजपात प्रवेशाची शक्यता

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

आघाडी सरकारच्या काळात माथाडी कामगारांच्या पूर्ण न केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करीत गेले दोन वर्षांपूर्वीच नरेंद्र पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील भांडी घासेन, असे वक्तव्य करून भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. तेव्हा पासून फडणवीस व पाटील यांच्या मैत्रिपूर्ण नाते तयार झाले होते. नवी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेल्या फडणवीस यांनी पाटील यांच्या घरीत अल्पोपहार घेतला होता. या प्रसंगावरून पाटील हे फडणवीस यांच्या खास मर्जीतील असलेल्यापैकी एक असल्याचे अधोरेखीत झाले होते. 

नवी मुंबई : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षाच्या सदस्यत्व व राष्ट्रवादीच्या लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. पाटील यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला दुसरा जबर धक्का बसला आहे. 

आघाडी सरकारच्या काळात माथाडी कामगारांच्या पूर्ण न केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करीत गेले दोन वर्षांपूर्वीच नरेंद्र पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील भांडी घासेन, असे वक्तव्य करून भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. तेव्हा पासून फडणवीस व पाटील यांच्या मैत्रिपूर्ण नाते तयार झाले होते. नवी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेल्या फडणवीस यांनी पाटील यांच्या घरीत अल्पोपहार घेतला होता. या प्रसंगावरून पाटील हे फडणवीस यांच्या खास मर्जीतील असलेल्यापैकी एक असल्याचे अधोरेखीत झाले होते. 

पाटील यांची भाजप व त्यांच्या नेत्यांसोबत वाढलेली जवळीकीने राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड अस्वतथा निर्माण झाली होती. पक्षांतील काही महत्वांच्या बैठकांमधून पाटील यांच्याकडे संशयनेही पाहिले जात होते. परंतू त्याबाबत पाटील यांनी कुठेच वाच्चता केली नव्हती. काही दिवसांपूर्वीच पाटील यांनी माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधातही मोर्चा पूकारून आपण माथाडी कामगारांसाठी काम करीत असल्याचे दाखवून दिले होते. 

पाटील यांच्या कर्तृत्वामुळे भाजपने त्यांच्या गळ्यात काही दिवसांपूर्वीच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदाची माळही घातली आहे. पाटील यांची वर्णी राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोबली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीस यांनी केलेल्या विविध नियुक्त्यांवर टिकास्त्र सोडले होते. परंतू या सर्वांना बगल देत पाटील यांनी अखेर राष्ट्रवादीच्या सदस्यत्वचा राजीनामा देत आपला भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे. अद्याप भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाली नसली तरी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पाटील यांच्या रूपात ठाणे जिल्ह्यात निरंजन डावखरे यांच्या नंतरचा राष्ट्रवादीला बसलेला हा दुसरा धक्का आहे. पाटील यांच्या निर्णयामुळे भाजपचे ठाणे जिल्ह्यातील ऐरोली मतदार संघातील बळ आणखिन वाढले आहे.  

मराठा समाजाच्या आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा कारभार मोठ्या प्रमाणात चालवण्यासाठी आणि तळातील लोकांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे माथाडी कामगार संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही. मराठा समाजाला महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक नड व प्रलंबित मागण्यांसाठी हा निर्णय घेतला आहे

नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. अध्यक्ष

संबंधित लेख