matha andolan band in raver | Sarkarnama

मराठा समाजातर्फे रावेरला पाच तास ठिय्या 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

जळगाव : रावेर (जि.जळगाव)येथे मराठा समाजा तफें आज निभोरासिम येथील तापी पुला जवळ व रावेर-मुक्ताईनगर रस्त्यावर पाच तास ठिया आंदोलन केले. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

पुलावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पुलावर जाण्याचा मार्गही पोलीसांनी बंद केला होता. मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मागणीसाठी रावेर तालुका मराठा समाजातर्फे तापी पुलाजवळ व रावेर मुक्ताईनगर रस्त्यावर पाच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. 

नागरिकांना अधिक त्रास्त होवू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी ऐन वेळेस प्रांताधिकारी अजीत थोरबोले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेले जलसमाधी आंदोलंनही रद्द करण्यात आले. आंदोलनात मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.पुलावर जाण्याचा मार्गच पोलीसांनी बंद केला होता.  

संबंधित लेख