आपले वडील पुन्हा कधीच परत येणार नाहीत हे दीड वर्षांच्या आयुषला कळलेले नाही 

.
shaheed-Ramesh-Yadav-&-fami.
shaheed-Ramesh-Yadav-&-fami.

वाराणसी :  जम्मू काश्‍मीर हायवेवर पुलवामा येथे गुरुवारी आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या रमेश यादव यांना दीड वर्षाचा लहान मुलगा आहे. सगळे घर शोकसागरात बुडालेले असताना त्याचा मुलगा आयुष खेळतोय. आपले वडील पुन्हा कधीच परत येणार नाहीत हे त्याच्या गावी सुद्धा नाही.

"सीआरपीएफ'च्या 61 व्या बटालियनमध्ये तैनात असलेले रमेश यादव 12 फेब्रुवारी रोजी सुट्या संपवून सीमा संरक्षणासाठी काशी जिल्ह्यातील तोफपूर ता. चौबेपूर या आपल्या गावातून जम्मूकडे रवाना झाले होते. रमेश यादव 26 वर्षांचे होते. चार वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षांचा एक मुलगा आहे.

गुरुवारी सायंकाळी रमेश हुतात्मा झाल्याची बातमी कुटुंबीयांना फोनवर कळाली आणि वडील श्‍याम नारायण यांना चक्कर आली तर वीर पत्नी रेणू या बेशुद्ध पडल्या. गावामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यादव कुटुंबीयांना धीर दिला.

वीर पत्नी रेणू शुद्धीवर आल्यावर रडत रडत  गावकऱ्यांना सांगत होत्या की, आपल्या मुलाबरोबरच आई वडिलांची सुद्धा तू चांगली काळजी घे. मी सीमेवर देशाचे रक्षण करीन तू घर सांभाळ, असे ते सांगून गेले होते. सरकारने अतिरेक्‍यांच्या घरात घुसून त्यांना मारावे. म्हणजे असे भ्याड हल्ले होणार नाहीत.

यादव कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने गावकरी सुद्धा दुःखात बुडाले होते. रमेश यांचे वडील श्‍याम नारायण शेतीची कामे करतात तर भाऊ कर्नाटकमध्ये दूध व्यवसायात आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com