स्वच्छता मोहिमेत मराठवाडा नापास

स्वच्छता मोहिमेत मराठवाडा नापास

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेत मराठवाडा नापास झाला आहे. देशभरातील 434 शहरांची यादी समोर आल्यानंतर महाराष्ट्रासह मराठवाडा देखील स्वच्छतेच्या बाबतीत बराच मागे असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील 44 शहरांपैकी मराठवाड्यातील 7 जिल्ह्याचा यात समावेश असून 1010 गुण मिळवत नांदेड जिल्हा 192 क्रमांकावर राहिला आहे. स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आलेले औरंगाबाद शहर 
794 गुणांसह 299 तर मराठवाड्यात चौथ्या स्थानावर आहे. 

स्वच्छता अभियान ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना समजली जाते. यासाठी सरकारकडून जनजागृतीपर जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च केला जातो. स्वच्छतेसाठी देशातील नागरिकांकडून अतिरिक्त कर देखील घेतला जातो. मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश सारखे देश स्वच्छतेच्या बाबातीत महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बरेच पुढे आहेत. डीएमआयसी, स्मार्टसिटी, जागतिक दर्जाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ, राज्याची पर्यटन राजधानी अशा विविध गोष्टींसाठीओळखले जाणारे औरंगाबाद शहर गेल्या काही वर्षांमध्ये "अस्वच्छ' शहर म्हणून ओळखले जात आहे. केंद्राच्या सर्वेक्षण मोहिमेमुळे यावर आता  शिक्कामोर्तब झाले आहे. त्या तुलनेत नांदेड, उस्मानाबाद, परभणी हे लोकसंख्येने आणि औद्योगिक दृष्टीने मागासलेले जिल्हे स्वच्छतेच्या बाबतीत औरंगाबादच्या कितीतरी पुढे आहेत. जालना आणि लातूर या दोन जिल्ह्यांनादेखील स्वच्छतेसाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार हेच या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. 

मराठवाड्यातील शहरांचा देशपातळीवरचा क्रमांक व मिळालेले गुण (अनुक्रमे) 
-------------------------------------------- 
नांदेड- 192 - 1010 उस्मानाबाद 219- 942 परभणी 229 - 924 औरंगाबाद 299 - 794 बीड 302- 786 
लातूर 318- 751 जालना 368 - 626 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com