martha mla satara and cm | Sarkarnama

मराठा आरक्षण : सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

कऱ्हाड : मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसंदर्भात राज्याच्या विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. कऱ्हाड तालुका मराठा समन्वय समितीच्या सदस्यांनी साताऱ्यात जिल्ह्यातील सर्व पक्षिय आमदारांची भेट घेतली, त्यावेळी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार एकत्रिपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

कऱ्हाड तालुका मराठा समन्वय समितीच्या सदस्यांनी सातारा येथे जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींची भेट घेतली. त्यावेळी आमदार शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट व्हावी यासाठी पुढाकार घेवू असे सांगितले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासन गंभीर नाही नसल्याची भावना राज्यातील मराठा समाजामध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी शासनाने विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मराठा समन्वय समितीची मागणी असल्याचे सदस्यांनी सांगितले. 

आंदोलनावेळी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणेची अजूनही ठोस कार्यवाही झाली नाही. अशी मराठा बांधवांनी समाजाच्या भावना असल्याचे सांगितले. यावेळी आमदारांसह जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, संचालक राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते. त्यावेळी लवकरच मुख्यमंत्र्यांची वेळ घेवून समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांपुढे जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार ठामपणे भूमिका मांडतील अशी ग्वाही आमदार शिंदे यांनी यावेळी दिली. 

संबंधित लेख