marketing director quashes sanjay kale`s plea | Sarkarnama

जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांना झटका

गणेश कोरे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे :  जुन्नर बाजार समितीमधील गाळ्यांचे वाटप रद्द करुन फेरलिलाव करण्याची मागणी पणन संचालकांना फेटाळल्यामुळे समितीचे विद्यमान सभापती संजय काळे यांचा झटका बसला आहे.  पणन संचालक डॉ. आनंद जोगदंड यांनी एक महिन्याच्या आता गाळेधारकांना भाडेकरार करुन देण्याचे आदेश बाजार समितीला दिले आहेत. गाळेवाटपांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत, हे वाटपच रद्द करावे अशी याचीका बाजार समितीने पणन संचालकांकडे केली होती. 

बाजार समितीवरील वर्चस्व मिळविण्यासाठी केलेल्या राजकीय खेळीसाठी झालेल्या वादातून हा न्यायालयीन तिढा वाढल्याचे सांगण्यात आले. आधीचे सभापती रघुनाथ लेंडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून तो मंजूर करण्यासाठी बरीच धडपड झाली होती.

लेंडे यांच्या काळात झालेले गाळेवाटप रद्द करण्यासाठी काळे हे प्रयत्नशील होते. यासाठी गाळ्यांचे वाटप कसे बेकायदेशीर आहे, याचा आधार घेत पणन संचालकांकडे याचिका दाखल केली होती. पणन संचालकांनी सुनावणी घेत प्रत्येक दावा खोडून काढला व गाळे वाटपामध्ये कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे सागंत याचिका फेटाळली.पणन संचालकांच्या निर्णयाच्या विरोधात याचीकाकर्ते पणनमंत्र्यांकडे दाद मागण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

संबंधित लेख