Market committee elections : eligible farmers can vote | Sarkarnama

कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक :पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार कायम 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई   : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी राज्य सरकारने 13 जून 2017 रोजी काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर झाले नसल्याने पुन्हा हा अध्यादेश नव्याने काढण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाने घेतला. 
यामुळे, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीन पात्र शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार पहिल्या अध्यादेशानुसार कायम राहणार आहे. 

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम-1963 मधील कलम 2, 13 व 14 मध्ये सुधारणा करण्यासाठी 13 जून 2017 रोजीचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 9 मधील तरतुदी पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि या अद्यादेशान्वये करण्यात आलेल्या कार्यवाहीस संरक्षण देण्यासह हा अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

संबंधित लेख