औरंगाबादेत संस्थापक शिवसैनिकांची संघटना : सात ते आठ माजी आमदार सोबत येणार असल्याचा दावा

माजी शिवसैनिकांनी एकत्रित येत 'संस्थापक शिवसैनिक संघटना' स्थापन केल्याची माहिती जिल्ह्याचे संस्थापक जिल्हा प्रमुख तथा मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी शनिवारी (ता. 14) पत्रकार परिषदेत दिली. आहे. प्रस्थापित, सरंजामशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणार असल्याचे सांगताना सुरवातीलाच त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली.
औरंगाबादेत संस्थापक शिवसैनिकांची संघटना : सात ते आठ माजी आमदार सोबत येणार असल्याचा दावा

औरंगाबाद : माजी शिवसैनिकांनी एकत्रित येत 'संस्थापक शिवसैनिक संघटना' स्थापन केल्याची माहिती जिल्ह्याचे संस्थापक जिल्हा प्रमुख तथा मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी शनिवारी (ता. 14) पत्रकार परिषदेत दिली. आहे. प्रस्थापित, सरंजामशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणार असल्याचे सांगताना सुरवातीलाच त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर तोफ डागली.

सध्या भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा विविध पक्षात असलेले शिवसेनेचे माजी पदाधिकारी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. यात माजी आमदार कैलास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), सुदाम सोनवणे (काँग्रेस), अविनाश कुमावत (भाजपा), राजु कुलकर्णी, रमेश सुपेकर, विठ्ठलराव जाधव, विजय पालीवाल, कारभारी जाधव, अॅड. सुहास जोशी यांचा समावेश होता.

सुभाष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या संघटनेचा विस्तार मराठवाड्यात होणार आहे. शिवसेनेचे सात ते आठ माजी आमदार संपर्कात असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. सांगण्यात आले. संघटनेच्या आतापर्यंत सहा बैठका झाल्या असून शेवटच्या बैठकीला पाच हजाराहुन अधिक माजी शिवसैनिकांची उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला.

तसेच यापुढे शिवसेनाच नव्हे तर कुठलाही पक्ष भ्रष्टाचार करत असेल तर, त्याला विरोध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संस्थापक शिवसैनिक संघटनेने खासदार खैरेंना टार्गेट करताना कन्नड तालुक्‍यातील मौजे आलापुर व देभेगाव येथील कामात खासदार निधीत 2015-16 मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली. याबाबत लोकसभा अध्यक्षांनाही निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com