युवा सेनेच्या  मॉक टेस्टला तरूणाईचा प्रचंड प्रतिसाद : दोन हजाराच्यावर विद्यार्थ्यांची अकोल्यात रंगीत तालीम

विद्यार्थी वर्गाचा विश्वास अल्पकाळात जिंकून त्यांच्या भविष्याचा मार्गदर्शक बनवण्याचा मान आज युवासेनेला मिळाला. दोन महाविद्यालायात झालेल्या मॉकटेस्टला तरूणाईचे उधाण आले होते. युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या उत्तम नियोजनाला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे. युवासेना आयोजीत मॉक टेस्ट २०१८ मध्ये अकोल्यात रविवारी सुमारे दोन हजार विद्यार्थांनी नीट, सीईटीची सराव परिक्षा दिली.
युवा सेनेच्या  मॉक टेस्टला तरूणाईचा प्रचंड प्रतिसाद  : दोन हजाराच्यावर विद्यार्थ्यांची अकोल्यात रंगीत तालीम

अकोला- विद्यार्थी वर्गाचा विश्वास अल्पकाळात जिंकून त्यांच्या भविष्याचा मार्गदर्शक बनवण्याचा मान आज युवासेनेला मिळाला. दोन महाविद्यालायात झालेल्या मॉकटेस्टला तरूणाईचे उधाण आले होते. युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांच्या उत्तम नियोजनाला व्यापक प्रतिसाद मिळाला आहे.  युवासेना आयोजीत मॉक टेस्ट २०१८ मध्ये अकोल्यात रविवारी सुमारे दोन हजार विद्यार्थांनी नीट, सीईटीची सराव परिक्षा दिली. 

महानगरातील दोन प्रमुख केंद्रावर पार पडलेल्या या परिक्षेला विद्याथ्र्यांनी रेकार्ड ब्रेक गर्दी  केली. युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ठ नियोजनाचे मुळे परिक्षा सुरळीत पार पडली असुन युवासेनेच्या उपक्रमाचे  पालकांनी कौतुक केले आहे. युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यां साठी युवासेना पुरस्कृत मॉक टेस्ट (नीट सीईटी) परीक्षा  रविवारी अकोल्यातील रालातो महविद्यालय व सिताबाई कला महाविद्यालयात पार पडली. मेडिकल, इंजिनिअरींग, लॉ, फार्मसी या पदवी साठी शासनाने महाराष्ट्र कॉमन एंटरन्स टेस्ट अनिवार्य केली आहे. सी.ई.टी,नीट परीक्षा २०१८ च्या पार्श्वभूमीवर सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 

ही परीक्षा रविवारी सकाळी १० सुरू करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांच्या  ऑनलाईन  नोंदणीचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील यांनी आधीच दोन परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था केली होती. रालोत महाविद्यालायाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष बिजीई सोसायाटीचे अध्यक्ष डॉ.आर.बी.हेडा, प्राचार्य विजय नानोटी, प्रा.माधव अंभारे, महिला जिल्हा संघटक ज्योत्स्नाताई चोरे, सेनेचे महानगरप्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, तरूण बगरे, शशी चोपडे, मुकेश मुरूमकार, प्रा.नरेंद्र लखाडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल रामभाऊ कराळे, जिल्हा समन्वयक निखीलसिंह ठाकुर, कुणाल  पिंजरकर, जिल्हासचिव अभिजीत मुळे पाटील, अकोला  शहरप्रमुख नितिन मिश्रा, उपजिल्हाप्रमुख दीपक बोचरे,  राजेश  पाटील, जिल्हा समन्वयक मुकेश निचळ, डॉ.सुनिल आवटे, कार्तिक गावंडे,उपशहरप्रमुख विक्कीसिंग  बावरी,  आस्तीक चव्हाण, दत्ता गावंडे, अजय  लेलेकर, कुणाल कुलट, महादेव अवनकार, जयवंत चिकटे,  प्रदिप राऊत, सचिन थाटे, सागर चव्हाण, रवी रिसोडकर,  सनी इंगळे, मुकेश हिरणवाडे, देवाशिष  भटकर, महेश मोरे, शाम बहुरुपे आदी उपस्थित होते. 

या परिक्षेसाठी गेल्या दोन आठवड्यापुर्वी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांनी विद्यार्थ्यांना नोंदणीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे २ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. अकोल्यात पार पडलेल्या परिक्षेला राज्यात सर्वाधिक संख्या असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान या विद्याथ्र्यांना परिक्षा देतांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणुन युवासेनेतर्फे पुर्णपणे दक्षता घेण्यात आली. परिक्षा केंद्रांवर युवासेनेतर्फे आरोग्य पथकही नियुक्त करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शुध्द आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिक्षा सुरू असतांना सेनेचे सह संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांनी केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com