झनक घराण्याची लोकप्रियता लाटेपेक्षा सरस

देशाच्या राजकारणात स्वातंत्र्यानंतर अनेक स्थित्यंतर आली. अनेकांचे किल्ले ढासळले, मात्र देशाच्या राजकारणात आलेल्या तीन लाटांमध्ये काँग्रेसने पुर्वश्रमीचा मेडशी व सध्याचा रिसोड मतदारसंघ कायम राखण्याची करामत केली आहे. झनक घराण्याने आपली लोकप्रियता लाटेपेक्षा सरस असल्याचे दाखवून दिले आहे.
झनक घराण्याची लोकप्रियता लाटेपेक्षा सरस

वाशीम : देशाच्या राजकारणात स्वातंत्र्यानंतर अनेक स्थित्यंतर आली. अनेकांचे किल्ले ढासळले, मात्र देशाच्या राजकारणात आलेल्या तीन लाटांमध्ये काँग्रेसने पुर्वश्रमीचा मेडशी व सध्याचा रिसोड मतदारसंघ कायम राखण्याची करामत केली आहे. झनक घराण्याने आपली लोकप्रियता लाटेपेक्षा सरस असल्याचे दाखवून दिले आहे.  

वाशीम जिल्ह्यातील सध्याचा रिसोड मतदारसंघ व पुर्वश्रमीचा मेडशी विधानसभा मतदार संघ कायम काँग्रेसला साथ देत आला आहे. 1977 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रामराव गोपाळराव झनक यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी संपुर्ण देशात जनता पक्षाची लाट होती. जनमत आणिबाणीच्या विरोधात व्यक्त झाले असताना रामराव गोपाळराव झनक बहुमताने विजयी झाले होते. देशाच्या राजकारणात 1995 मध्ये हिंदुत्वाची लाट जोरात होती. संपुर्ण देशात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला असताना मेडशी विधानसभा मतदार संघात सुभाष झनक यांनी भाजपाचे विजय जाधव यांचा पराभव करून हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात ठेवला होता. 

माजी मंत्री स्व. सुभाष झनक यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुभाष झनक यांचे पुत्र विद्यमान आमदार अमित झनक विजयी झाले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी संपूर्ण देश मोदी लाटेने ढवळून निघाला होता. या वावटळीत जिल्ह्यातील तीन पैकी दोन मतदारसंघ भाजपने जिंकले असताना रिसोड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत मात्र काँग्रेसचे अमित झनक विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे विजय जाधव यांचा पराभव केला होता. 

या मतदारसंघात रामराव गोपाळराव झनक यांनी चार वेळा, सुभाष झनक यांनी तीन वेळा तर विद्यमान आमदार अमित झनक यांनी दोन वेळा हा मतदारसंघ काँग्रेसच्या खाती जमा केला आहे. या मतदारसंघात झनक घराण्याच्या तीन पिढ्या शेतकरीकेंद्रीत राजकारण करीत आहेत. मतदार संघातील शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम या घराण्याकडून होत असल्याने ग्रामीण भागातील जनता कायम काँग्रेसला साथ देत आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com