विष्णू सावरांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड : संचालक मंडळाबरोबर मुंबईत 17 ला बैठक 

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या महामंडळातील अकार्यक्षम कार्यप्रणालीविरुद्ध संचालकांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर सावरा यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडपड सुरू केली. आदिवासी विकास महामंडळाच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी म्हणून रस्त्यावर उतरलेल्या संचालक मंडळाची मनधरणी करण्यासाठी 17 एप्रिलला दुपारी दोनला मंत्रालयात संचालक मंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. या वेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट व तिन्ही विभागांचे सचिव उपस्थित राहतील.
विष्णू सावरांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड : संचालक मंडळाबरोबर मुंबईत 17 ला बैठक 

नाशिक : आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या महामंडळातील अकार्यक्षम कार्यप्रणालीविरुद्ध संचालकांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर सावरा यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडपड सुरू केली. आदिवासी विकास महामंडळाच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी म्हणून रस्त्यावर उतरलेल्या संचालक मंडळाची मनधरणी करण्यासाठी 17 एप्रिलला दुपारी दोनला मंत्रालयात संचालक मंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. या वेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट व तिन्ही विभागांचे सचिव उपस्थित राहतील.

आदिवासी विकास महामंडळातील गैरकारभाराची चौकशी व्हावी, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली त्याप्रमाणे आदिवासी जनतेचे खावटी कर्ज माफ करावे अशी संचालकांची मागणी आहे. महामंडळातील भरतीप्रकरणी बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने संचालक मंडळाला याबाबत अंधारात ठेवले जात आहे, असाही आरोप आहे. प्रमुख निर्णयांमध्ये संचालक मंडळास ग्राह्य धरले जात नाही, या प्रमुख मागण्यांबरोबरच विष्णू सावरा यांच्या कार्यप्रणालीविरुद्ध संचालक मंडळाकडून आदिवासी विकास विभागाबाहेर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. 

शनिवारी (ता. 7) दुसऱ्या दिवशी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी या आंदोलनाची दखल घेत व्यवस्थापकीय संचालक दिनकर जगदाळे व संचालक मंडळासमवेत चर्चा केल्यानंतर 17 एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सवरा यांना वाचविण्यासाठी संचालक मंडळास बैठकीची वेळ दिली. यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, आदिवासी विकासमंत्री सवरा उपस्थित राहणार असल्याचे लेखी पत्र या वेळी संचालक मंडळास दिल्यानंतर संचालकांकडून उपोषण मागे घेण्यात आले. या बैठकीस आदिवासी आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, माजी आमदार धनराज महाले, संचालक मीनाक्षी वट्टी, भरतसिंग दूधनाग, विकास वळवी, मधुकर काठे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. 

...अन्यथा सावरांना घेराव
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत महामंडळाच्या समस्यांप्रश्‍नी सकारात्मक चर्चा झाली नाही, तर तत्काळ आदिवासी विकासमंत्री सवरा यांना घेराव घालून मंत्रालयातच आंदोलनाचा इशारा या वेळी संचालक मंडळाकडून देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com