औरंगाबाद पालिका पदाधिकाऱ्यांची उद्धव यांच्याकडून कचरा प्रश्नी झाडाझडती शक्य

औरंगाबाद पालिका पदाधिकाऱ्यांची उद्धव यांच्याकडून कचरा प्रश्नी झाडाझडती शक्य

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी (१९) सकाळी अकरा वाजेपासून मराठवाड्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. शुक्रवारी नगर आणि सोलापूर जिल्ह्याचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत.

औरंगाबाद: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी (१९) सकाळी अकरा वाजेपासून मराठवाड्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. शुक्रवारी नगर आणि सोलापूर जिल्ह्याचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत.

भाजपकडून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युती व्हावी यासाठी शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न सुरु आहे. पण शिवसेना मात्र स्वबळाच्या आपल्या बाण्यावर कायम असल्याचे दिसते. भाजपने मुका घेतला तरी युती शक्य नसल्याचे शिवसेनेचे नेते सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. मराठवाड्यातील आठ आणि नगर, सोलापूर आशा दहा जिल्ह्याचा आढावा ते घेणार आहेत.

उद्या सकाळी साडेदहा वाजता चिकलठाणा विमातळावर उतरुन नंतर उद्धव ठाकरे पश्चिमचे आमदार संजय सिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर अकरा ते सायंकाळ पर्यंत सुभेदारी विश्रामगृह येथे मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघाचा, तर दुसऱ्या दिवशी नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील आढावा घेतील. या शिवाय शहरातील कचरा, पाणी प्रश्नासह विविध नागरी प्रश्नावर ते महापौर आणि शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी, नगरसेवक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बोलले जाते. शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या कचऱ्याचा प्रश्न राज्यभर गाजतो आहे. त्यामुळे पक्षाची मोठ्या प्रमाणात बदनामी देखील झाली. 'महानगरपालिका बरखास्त करा,' अशी मागणी आधी विधानसभेत आणि आता लोक रस्त्यावर उतरून करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महापालिकेतील पदाधिकारी व स्थानिक नेत्यांची खरडपट्टी काढणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com