Marathi Political News Tukaram Mundhe Strats inquiry | Sarkarnama

तुकाराम मुंढेंनी सुरु केली 11 अधिकाऱ्यांची चौकशी 

संपत देवगिरे 
शुक्रवार, 2 मार्च 2018

नागरीकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्रशासन व अधिकाऱ्याने प्राधान्य देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यात कसुर झाल्यास संबंधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई केली जाईल. प्रशासन कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी अंतर्गत शीस्त लावली जाईल नागरीकांना केंद्रबिंदु ठेऊन काम केले जाईल असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येथे सांगितले. 

नाशिक : नागरीकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्रशासन व अधिकाऱ्याने प्राधान्य देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यात कसुर झाल्यास संबंधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई केली जाईल. प्रशासन कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी अंतर्गत शीस्त लावली जाईल नागरीकांना केंद्रबिंदु ठेऊन काम केले जाईल असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येथे सांगितले. 

"पालिकेच्या 11 अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत चौकशीत तीन वरिष्ठ अधिकारी दोषी आढळले आहेत. या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नोटीस बजावण्यात आली आहे. यावर उत्तर देण्यासाठी त्यांना काही दिवसांची अंतीम मुदत देण्यात आली आहे. त्यांच्या उत्तरानंतर मात्र लवकरच काय कारवाई करणार हे निश्‍चित केले जाईल. प्रशासनाने प्रस्तावित केलेली घरपट्टी नियमानुसारच आहे. मात्र ती अवास्तव झाल्याचं दाखवलं जाते आहे,'' असे त्यांनी स्पष्ट केले. 

''महानगरपालिकेत ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली 2014 मध्ये सुरु केली. त्याचे मोबाईल ऍप्लिकेशन 2015 मध्ये सुरु केले. त्याद्वारे ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली सुरु झाली. त्यात दरवर्षी सरासरी पंचवीस ते तीस हजार तक्रारी प्राप्त होतात. त्याचा उपयोग परिणामकारक निवारणासाठी मदत होईल. नव्या कार्यप्रणालीत तक्रारदाराला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर संबंधीत तक्रारीचे नाराकरण अधिकाऱ्याला करावे लागेल. त्यावर समाधानी नसल्यास नागरीकांस ती तक्रार वरीष्ठांकडे करण्याची एक संधी मिळेल. हे निवारण खातेप्रमुखावर सोपवले आहे. सात दिवसांत त्याचे निराकरण न झाल्यास संबंधीतांना खुलासा मागितला जाईल. या माध्यमातुन महापालिकेचे कामकाज तसेच नागरीकांचे तक्रार निवारण ऑनलाईन होणार आहे. महापालिकेच्या सर्व सेवा यापुढे ऑनलाइन केल्या जाणार आहेत. त्यासाठी 'एनएमसी-ई' कनेकट हे नवे ऍप सुरु करण्यात आले. त्यात नागरिकांचे प्रश्न ऑनलाइन सोडवले जातील." असेही मुंढे यांनी सांगितले.

संबंधित लेख