तुकाराम मुंढेंनी तेवीस विभाग बंद केल्याने राजकीय नेते अस्वस्थ ! 

खर्चात बचत, कामकाजात सुसुत्रता आणि नागरीकांच्या तक्रारींचे जलद निवारण या त्रिसूत्रीमुळे महापालिकेच्या अन्‌ शहराच्या कामकाजाला आता गती येऊ लागली आहे. ही घडी नीट बसविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पाऊल पुढे टाकत प्रशासनाच्या सेहेचाळीस विभागांची संख्या तेवीसवर आणली आहे. निम्मे विभाग बंद केले असून काही नवे विभाग निर्माण झाल्याने हा 'पॅटर्न' चर्चेत आला आहे.
तुकाराम मुंढेंनी तेवीस विभाग बंद केल्याने राजकीय नेते अस्वस्थ ! 

नाशिक : खर्चात बचत, कामकाजात सुसुत्रता आणि नागरीकांच्या तक्रारींचे जलद निवारण या त्रिसूत्रीमुळे महापालिकेच्या अन्‌ शहराच्या कामकाजाला आता गती येऊ लागली आहे. ही घडी नीट बसविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक पाऊल पुढे टाकत प्रशासनाच्या सेहेचाळीस विभागांची संख्या तेवीसवर आणली आहे. निम्मे विभाग बंद केले असून काही नवे विभाग निर्माण झाल्याने हा 'पॅटर्न' चर्चेत आला आहे. 

महापालिकेच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रणासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागप्रमुखांच्या कामकाजात बदल केले. अवास्तव वाढविण्यात आलेले विभाग कमी केले. महापालिकेतील सेवांचे विभाग व उपविभागांचे प्रशासकीय, तांत्रिक, व लेखा या तीन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक व नियोजन विभाग, प्रकल्प विभाग, समाजकल्याण, पशुसंवर्धन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अभियांत्रिकी व पर्यावरण हे नवीन विभाग निर्माण केले आहेत. सार्वजनिक वाहतूक व नियोजन, प्रकल्प विभाग, समाजकल्याण, पशुसंवर्धन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अभियांत्रिकी व पर्यावरण या विभागांची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. गुणवत्ता व नियंत्रण कक्षाला स्वतंत्र दर्जा दिला आहे. सार्वजनिक वाहतुक व नियोजन अंतर्गत अर्बन मोबिलीटी सेल, वाहतुक नियंत्रण व नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी महाव्यवस्थापक नियुक्त केला जाणार आहे. 

आयुक्तांच्या या फेररचनेमुळे अनेक नेत्यांच्या आवडत्या व पसंतीच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल झाले. अधिकाऱ्यांच्या जागा बदलल्याने अनेक नेत्यांना हा धक्का मानला जातो. त्यामुळे काही वजनदार नगरसेवक 'डिस्टर्ब' झाले आहेत. मात्र, आयुक्तांना सांगता येत नाही. त्यातच अधिकारीही राजकीय नेत्यांपासून अंतर ठेवू लागल्याने शहरात व मतदारांतील प्रभाव घटण्याची भिती सतावू लागली आहे. यासंदर्भात सत्ताधारी नगरसेवक पालकमंत्र्यांच्या कानी ही तक्रार मांडण्याच्या तयारीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com