कर चुकवलेल्या साठ हजार मालमत्ता तुकाराम मुंढेंनी शोधल्या

कर चुकवलेल्या साठ हजार मालमत्ता तुकाराम मुंढेंनी शोधल्या

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेचे महसुलवाढीचे आव्हानही स्विकारले आहे. मात्र, गेली अठरा वर्षे शहरात करवाढीचा विषयच निघाला नव्हता. राजकीय सोय- गौरसोयीमुळे ती अनेकांच्या पचनी पडलेला नाही. या वाद- विवादात आयुक्तांनी बांधून तयार, वापरातील तसेच सदोष आकारणीच्या साठ हजार मालमत्ता शोधुन काढल्या. यंदा त्यावर करवाढ होईल. यातुन महापालिकेचा महसुल 82 कोटींवरुन अडीचशे कोटींवर जाण्याचा अंदाज आहे.

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेचे महसुलवाढीचे आव्हानही स्विकारले आहे. मात्र, गेली अठरा वर्षे शहरात करवाढीचा विषयच निघाला नव्हता. राजकीय सोय- गौरसोयीमुळे ती अनेकांच्या पचनी पडलेला नाही. या वाद- विवादात आयुक्तांनी बांधून तयार, वापरातील तसेच सदोष आकारणीच्या साठ हजार मालमत्ता शोधुन काढल्या. यंदा त्यावर करवाढ होईल. यातुन महापालिकेचा महसुल 82 कोटींवरुन अडीचशे कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. 

महापालिकेची स्थापना 1981 मध्ये झाली. 1992 मध्ये लोकनियुक्त कारभारी सत्तेत आले. 1998 मध्ये अल्पशी करवाढ झाली. शहराची लोकसंख्या सहा लाखांवरुन सोळा लाखांवर गेली. या सबंध कालावधीत विकास म्हणजे केंद्र- राज्य शासनाच्या योजनांचे अनुदान व सिंहस्थ निधी हा एकमेव स्त्रोत राहिला. सध्या शहराचे क्षेत्रफळ 26,747 हेक्‍टर आहे. यामध्ये रहिवासी 12,835, औद्योगिक 1552, सार्वजनिक- निमसार्वजनिक 1,059, दळणवळण 2,862, वनक्षेत्र 250 आणि शेती 4,542 हेक्‍टर आहे. आता या मोकळ्या जागांवर देखील चाळीस पैसे प्रती चौरस फुट आकारणी होईल. दबावातून ती वीस पैसे करुन हिरव्या पट्ट्यातील शेतीला वगळले आहे. जिल्हा प्रशासनाने 42-ब नोटीस बजावुन शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक बिगरशेती उपक्रम राबवला. त्यात 10,152 शेतकऱ्यांनी जमिनी 'एनए' केल्या. त्या आता करपात्र ठरतील. 

'ब' वर्ग महापालिका व मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले शहर म्हणुन विकासाच्या प्रचंड अपेक्षा वाढल्या आहेत. यातुन विकासाची अंधुक संधी व बिकट वाटचाल यात स्वबळावर सत्तेत आलेल्या भाजपला मार्गक्रमण करायचे आहे. 1400 कोटींचे अंदाजपत्र 1700 कोटींवर नेत अन्‌ त्यात महापालिकेचा मालमत्ता कर वाढवुन 82 कोटींचा महसुल 250 कोटींवर पोहोचण्याची शक्‍यता आहे. ही वाढ जवळपास अडीचशे टक्के आहे. एव्हढी अशक्‍य वाटणारी वाढ महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली आहे. याकडे अद्याप अनेकांचे लक्ष गेलेले नाही. अनेक व्यवसायिकांच्या हिताला बाधा पोहोचल्याने हा वाद व तक्रारी असतांना वाद पोहोचणार आहे. येत्या 19 ला विशेष महासभा घेण्याचे जाहीर केल्याने त्याकडे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com