गणेशवाडी भाजीमंडई सुरु करण्याचे आव्हान आयुक्त तुकाराम मुंढे स्विकारणार?

गोदावरीकाठी भरणारा भाजीबाजार हलविण्यासाठी सात कोटींचा गणेशवाडी भाजीबाजार महापालिकेने बांधला. मात्र, भाजीविक्रेते अडुन बसल्याने स्थलांतर रखडले. त्यामुळे हा बाजार भिका-यांचे आश्रयस्थान बनला होता. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांची नजर पडताच ही मंडई आता चकाचक झाली आहे. गोदाकाठचा बाजार स्थलांतर आयुक्त मुंढे स्विकारतील काय हा शहरापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे.
गणेशवाडी भाजीमंडई सुरु करण्याचे आव्हान आयुक्त तुकाराम मुंढे स्विकारणार?

नाशिक : गोदावरीकाठी भरणारा भाजीबाजार हलविण्यासाठी सात कोटींचा गणेशवाडी भाजीबाजार महापालिकेने बांधला. मात्र, भाजीविक्रेते अडुन बसल्याने स्थलांतर रखडले. त्यामुळे हा बाजार भिका-यांचे आश्रयस्थान बनला होता. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांची नजर पडताच ही मंडई आता चकाचक झाली आहे. गोदाकाठचा बाजार स्थलांतर आयुक्त मुंढे स्विकारतील काय हा शहरापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे.     

गोदावरी नदीपात्रात भाजीबाजार भरतो. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्याचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी सात कोटी रुपये खर्च करुन गणेशवाडी येथे अद्ययावत भाजीबाजार बांधला. मात्र, त्यानंतर त्यात काही विक्रेते व स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे त्यावर राजकारण सुरु झाले. काहींनी न्यायालयात धाव घेतल्याने तत्पुरती स्थगिती मिळाली होती. त्यानंतर कोट्यावधी खर्च करुन बांधलेला भाजीबाजार भिका-यांचे आश्रयस्थान बनले होते. येथे अस्वच्छता पसरली. त्यामुळे शहराचा हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. 

नुकतीच आयुक्त मुंढे यांनी गोदावरी परिसराची पाहणी केली होती. त्यात त्यांनी गणेशवाडी मंडईची अवस्था पाहिल्यावर मंडई स्वच्छतेच्या सुचना दिल्या होत्या. आता ही मंडई चकाचक झाली आहे. मुंढे यांच्या आदेशान्वये या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन हा परिसर चकाचक करण्यात आला असला तरी या ठिकाणी कायम लक्ष देण्याची गरज आहे. 

स्थानिक नगरसेवकांची त्यावर वेगळीच भूमिका असून त्यांच्यातील राजकारणामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. यातील बरेचसे भाजीविक्रेते स्थलांतरास तयार असल्याचे कळते. उर्वरीत विक्रेत्यांच्या काही अडचणी आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन हे प्रश्न सोडविल्यास भाजीबाजाराचे स्थलांतर शक्य आहे. आतापर्यंत विविध आयुक्तांनी हा प्रश्न हाताळला होता. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींचे राजकारण आडवे आल्याने तो भिजत पडला. आता शहराचा गंभीर प्रश्न आयुक्त मुंढे भाजीबाजार सुरु करण्याचे आव्हान स्विकारतील काय हा प्रश्न आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com