Marathi Political News Trambakeshwar Land Case | Sarkarnama

त्र्यंबकेश्‍वर जमीन गैरव्यवहारातील तहसीलदारांसह 35 जणांचे अटकपूर्व जामिन अर्ज फेटाऴले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 मार्च 2018

विभागीय महसुल आयुक्त महेश झगडे यांनी उघडकीस आणलेल्या दोनशे कोटींच्या देवस्थानच्या जमीन गैरव्यवहारातील दोन तहसीलदार, बिल्डर व कोलंबिका देवस्थानच्या विश्वस्तांसह पस्तीस जणांचे अटकपुर्व जामिन अर्ज फेटाळले. अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर. आर. वैष्णव यांनी सर्व अर्ज फेटाळल्याने खळबळ उडाली आहे. 

नाशिक : विभागीय महसुल आयुक्त महेश झगडे यांनी उघडकीस आणलेल्या दोनशे कोटींच्या देवस्थानच्या जमीन गैरव्यवहारातील दोन तहसीलदार, बिल्डर व कोलंबिका देवस्थानच्या विश्वस्तांसह पस्तीस जणांचे अटकपुर्व जामिन अर्ज फेटाळले. अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर. आर. वैष्णव यांनी सर्व अर्ज फेटाळल्याने खळबळ उडाली आहे. 

जिल्हा न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी वकील अजय मिसर यांनी अंतरिम जामिनास हरकत घेतली असता, सर्व 35 संशयीतांचे जामीन अर्जांवर न्यायालयाने शासनाला म्हणणे मांडण्यासाठी 3 मार्चपर्यंत मुदत दिली होती.
याप्रकरणी नायब तहसीलदार एस. एम. निरगुडे यांच्या तक्रारीवरून त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कोलंबिकादेवी व गंगाद्वार ट्रस्ट देवस्थानची 185 एकर जमीन शासनाची व धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता परस्परविक्री केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यात आशुतोष इंदुकांत महाजन, प्रशांत इंदुकांत महाजन, संतोष शरद महाजन, संदीप शरद महाजन, देवेंद्र श्रीपाद महाजन, साईकेश श्रीपाद महाजन, प्रदीप नारायण महाजन, अरुण वसंत महाजन, मनीष अरुण महाजन, अरविंद वसंत महाजन, दुर्गेश अरविंद महाजन, मुकुंद रामचंद्र महाजन, केदार मुकुंद महाजन, हर्षद मुकुंद महाजन, जयंत रामचंद्र महाजन, प्रभाकर शंकर महाजन, अद्वैत प्रभाकर महाजन, सदाशिव शंकर महाजन (सर्व रा. महाजन चौक, त्र्यंबकेश्‍वर) यांचा समावेश आहे. 

याशिवाय तत्कालीन तलाठी भास्कर मुरलीधर हांडोरे, मंडल अधिकारी नंदिनी सोर, मुकुंदराव बिरारी, तहसीलदार रामसिंग हिरालाल सुलाने, रवींद्र रमेश भारदे यांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत. संशयितांतर्फे अॅड. जयदीप वैशंपायन, अॅड. एस. एस. भाटे, अॅड. मंदार भानोसे यांनी बाजु मांडली. अटकपूर्व जामिन फेटाळल्याने राजकीय तसेच बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.   

संबंधित लेख