भाजपतर्फे इतरांची पाठराखण, खडसेंना मात्र शासन : खासदार सुप्रिया सुळे 

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राज्यातील भ्रष्टाचारांची पाठराखण केली. परंतू, जळगावातील नेतृत्वाला मात्र सत्तेपासून दूर ठेवले हाच खरा जिल्ह्यावर केलेला अन्याय आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नांव न घेता केली. रावेर येथे सभेत त्या बोलत होत्या.
भाजपतर्फे इतरांची पाठराखण, खडसेंना मात्र शासन : खासदार सुप्रिया सुळे 

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राज्यातील भ्रष्टाचारांची पाठराखण केली. परंतू, जळगावातील नेतृत्वाला मात्र सत्तेपासून दूर ठेवले हाच खरा जिल्ह्यावर केलेला अन्याय आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नांव न घेता केली. रावेर येथे सभेत त्या बोलत होत्या. 

राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा जळगाव जिल्हयात दाखल झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी सकाळी रावेर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. छोरीया मार्केटसमोर झालेल्या सभेत व्यासपीठावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, अरूणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष अॅड.सतीश पाटील आदी उपस्थित होते. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "भारतीय जनता पक्षाच्या शासन हे राज्यात भ्रष्टाचाऱ्याना एकीकडे पाठीशी घालत असतांना दुसरीकडे मात्र जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे नेतृत्व असलेल्या नेत्याला मात्र दूर ठेवले.या सरकारने सर्वात जास्त अन्याय जळगाव जिल्ह्यावर केला आहे. जळगाव जिल्हयात केळी प्रश्‍न सर्वात महत्वाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केळी प्रश्‍नाबाबत सातत्याने लक्ष देवून तो सोडविला आहे. परंतु आज केळी उत्पादन करणारा शेतकरी अडचणीत असताना शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com