अकोल्याची सुकन्या डाॅ. निरूपमा डांगे आता बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी

महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे मुळ अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण येथील राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या कन्या डॉ. निरुपमा डांगे यांची बुलडाणा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता मातृतिर्थाच्या विकासात्मक आणि प्रशासकीय सुसूत्रतेची घौडदौड नारीशक्तीच्या हाती आली आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्याला पहिल्यांदा महिला जिल्हाधिकारी म्हणून कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली आहे.
अकोल्याची सुकन्या डाॅ. निरूपमा डांगे आता बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी

बुलडाणा : महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे  मुळ अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण येथील राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या कन्या डॉ. निरुपमा डांगे यांची बुलडाणा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता मातृतिर्थाच्या विकासात्मक आणि प्रशासकीय सुसूत्रतेची घौडदौड नारीशक्तीच्या हाती आली आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्याला पहिल्यांदा महिला जिल्हाधिकारी म्हणून कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. 

अकोला जिल्ह्यातंर्गत तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथील रहिवासी राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांना दोन मुले आणि एक मुलगी असून, तिघेही एमबीबीएस आहेत. निरुपमा यांनी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. त्यानंतर त्या काही दिवस जे. जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. नंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यास सुरू केला. 2007 च्या कॅडरमध्ये यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या निरुपमा यांना महाराष्ट्रातच पहिली पोस्टिंग मिळाली होती ती जळगावला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपद त्यांनी सांभाळले. 

सध्या त्या नागपूर येथे खनिकर्म खनिकर्म महामंडळाच्या महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या. शुक्रवारी राज्याचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी एका आदेशाव्दारे त्यांची बदली बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून केली आहे. डॉ. निरुपमा डांगे यांचे पती हे सुद्धा आयपीएस अधिकारी असून, नागपूर येथे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, डॉ. निरुमता डांगे यांना प्रथम पोस्टिंग जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिळाले होते, त्यावेळी तत्कालीन पोलिस अधीक्षक म्हणून त्यांचे पती इश्यू सिंधू  जळगावला कार्यरत होते. 

जिल्ह्याला पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी म्हणून डॉ. निरुपमा डांगे मिळाल्या असल्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्यातील विकासात्मक तसेच प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या बदलीमुळे गत काळात प्रलंबित असलेले विविध प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या, समृध्दी महामार्गातील अडचणी, पाणी समस्या, जिगाव प्रकल्पाचे मुख्य प्रश्‍नांसह इतरही महत्त्वपूर्ण प्रश्‍नांवर उपाय करत निकाली काढण्याच्या अपेक्षा वाढल्या आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com