माजीमंत्री सावजींचा 'यू टर्न' - खुनाची धमकी ते उपोषण

जिल्ह्यातील शासकीय नळ पाणीपुरवठा योजनांमधील गैरव्यवहार, अनागोंदी विरूद्ध माजी मंत्री सुबोध सावजी यांचे आंदोलन सुरू आहे. विभागीय आयुक्तांनी आदेश देऊनही निर्ढावलेली यंत्रणा जागी होत नाही. हे पाहून सावजी यांनी थेट अधिका-यांचा खून करण्याची धमकी दिली होती. मात्र, तरीही उपयोग न झाल्याने सावजींनी आता उपोषणाला सुरवात केली.
माजीमंत्री सावजींचा 'यू टर्न' - खुनाची धमकी ते उपोषण

बुलडाणा : जिल्ह्यातील शासकीय नळ पाणीपुरवठा योजनांमधील गैरव्यवहार, अनागोंदी विरूद्ध माजी मंत्री सुबोध सावजी यांचे आंदोलन सुरू आहे. विभागीय आयुक्तांनी आदेश देऊनही निर्ढावलेली यंत्रणा जागी होत नाही. हे पाहून सावजी यांनी थेट अधिका-यांचा खून करण्याची धमकी दिली होती. मात्र, तरीही उपयोग न झाल्याने सावजींनी आता उपोषणाला सुरवात केली.

'जिल्हा शासकीय जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मागण्यांवर अमरावतीचे विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाची कार्यवाही झाली पाहिजे. जिल्ह्यातील सर्व योजनांच्या शासकीय नळ पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार गुन्हे दाखल झाले पाहिजे. प्रत्येक गावात दररोज पिण्याचे पाण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे,' या त्यांच्या मागण्या आहेत. त्यांच्या उपोषणाला विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला असून जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध किडनीग्रस्त गावकरी उपोषणात सहभागी झाले. उपोषणाला पाठिंबा म्हणून काहींनी मंडपातच रक्तदान केले.

या उपोषणाला राधेश्याम चांडक, माजी आमदार दिलीप सांनदा, आमदार हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, अ‍ॅड. साहेबराव सरदार, माजी सभापती सायली सावजी, बद्रिनाथ वाघ, आशा झोरे,  रमेश धोत्रे,  अ‍ॅड. भास्करराव सांगळे, दामुअण्णा, ढोणे, दत्तू रहाटे, रमेश चनपुरे, चंद्रकांत माने, संजय तारापूरे, कडूबा देशमुख, लक्ष्मण दादंडे, अबरार भाई, अशोक सुरडकर, शंकरराव गाभणे, सुधाकर ढोणे, रसूल भाई, शिवदास रिंढे, शैलेश सावजी, विनायक चंद, दिलीप सावजी, विनोद देशमुख, खुशालराव गायकवाड, सुनीला भांड, भाजपचे जगदेवराव बाहेकर यांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. पण जी यंत्रणा खुनाच्या धमकीला घाबरली नाही ती उपोषणाला किती गांभीर्याने घेईल हा चिंतनाचाच विषय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com