माेर्शी विधानसभेसाठी सुबाेध माेहितेंचा ‘स्वाभिमानी’ शी घराेबा

कितीही अाेढाताण केली तरी माेर्शी विधानसभा मतदारसंघ शिवसंग्रामकडून सुटणार नसल्याचे कळून चुकल्यानेच माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते पाटील यांनी शिवसंग्रामला साेडचिठ्ठी देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी घराेबा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे. या मतदारसंघात स्वाभिमानी संघटनेचे वाढते प्रस्थ अाणि सामाजिक समीकरणाचा फायदा उचलण्याची रणनिती सुबाेध माेहिते पाटील यांनी अाखली अाहे.
माेर्शी विधानसभेसाठी सुबाेध माेहितेंचा ‘स्वाभिमानी’ शी घराेबा

अकाेला : कितीही अाेढाताण केली तरी माेर्शी विधानसभा मतदारसंघ शिवसंग्रामकडून सुटणार नसल्याचे कळून चुकल्यानेच माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते पाटील यांनी शिवसंग्रामला साेडचिठ्ठी देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी घराेबा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे. या मतदारसंघात स्वाभिमानी संघटनेचे वाढते प्रस्थ अाणि सामाजिक समीकरणाचा फायदा उचलण्याची रणनिती सुबाेध माेहिते पाटील यांनी अाखली अाहे. 

भाजप महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते पाटील यांनी नुकतीच शिवसंग्रामला साेडचिठ्ठी देत खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला अाहे. गत दाेन वर्षांपासून सुबाेध माेहिते पाटील हे अमरावती जिल्ह्यातील माेर्शी विधानसभा मतदारसंघात माेर्चेबांधणी करीत अाहेत. शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्ते जाेडण्यासाठी सभा, बैठकांचा धडाका त्यांनी लावला अाहे. मात्र, या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान अामदार डॉ. अनिल बाेंडे यांची उमेदवारी कापणे अशक्य असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांनी नव्या पक्षाचा पर्याय शाेधणे सुरू केले. 

सध्या केंद्र व राज्यातील भाजप सरकारविषयी शेतकरी, सर्वसामान्य जनतेत असलेला असंताेष लक्षात घेता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी घराेबा केला. गेल्या दाेन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भूयार यांनी विविध अांदाेलने करून माेर्शी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानीचे मजबुत जाळे विनले अाहे. त्यांचा फायदा अागामी निवडणुकीत संघटनेला हाेणार अाहे. 

त्यामुळे अागामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून सुबाेध माेहिते यांची उमेदवारी अामदार डॉ. अनिल बाेंडे यांच्यासाठी माेठ्या अडचणीची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू अाहे. मतदारसंघातील सामाजीक समीकरण, स्थानिक पातळीवर भाजपमध्ये वाढलेले पक्षातंर्गत कुरघाेडीचे राजकारण सुबाेध माेहिमे यांच्या पथ्यावर पडू शकते. मात्र, तिन वेळा अामदारकी भुषविणारे अनिल बाेंडे यांना टक्कर देतांना सुबाेध माेहितेंना माेठी कसरत करावी लागणार अाहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com