शेगाव संस्थान विरोधातील शक्तींना कुणाचं पाठबळ?

विविध सेवा प्रकल्प राबवून आध्यत्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देत असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान विरोधात गेल्या काही दिवसांपासून मूठभर लोकांनी आघाडी उघडली आहे. इतिहासात प्रथमच मोर्चे, सभा असे प्रकार होत आहेत. हा विषय संवेदनशील असतांना सुद्धा पोलिस अधिकारी अश्या आंदोलनास परवानगी देत असल्याने या आंदोलनकर्त्यांना कुणाचं पाठबळ असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
शेगाव संस्थान विरोधातील शक्तींना कुणाचं पाठबळ?

शेगाव :  विविध सेवा प्रकल्प राबवून आध्यत्मिक आणि सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देत असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान विरोधात गेल्या काही दिवसांपासून मूठभर लोकांनी आघाडी उघडली आहे. इतिहासात प्रथमच मोर्चे, सभा असे प्रकार होत आहेत. हा विषय संवेदनशील असतांना सुद्धा पोलिस अधिकारी अश्या आंदोलनास परवानगी देत असल्याने या आंदोलनकर्त्यांना कुणाचं पाठबळ असा प्रश्न उपस्थित होतो आहे. 

शेगावची देशभर ओळख श्री गजानन महाराज संस्थानमुळे निर्माण झाली आहे. राज्य व देशातून दररोज भाविक संतनगरीत येतात. त्यामुळेच शेगाव व्यवसाय वृद्धी झाली. मार्केट वाढले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सोयी सुविधा देण्यासाठी विकास आराखडा आला. त्यात रस्ते व इतर कामे झाली. रस्ता रुंदीकरण कामात काही व्यापारी लोकांची दुकानांची जागा कमी झाली. मंदिर परिसर मोकळा करण्यासाठी तेथील दुकाने रिकामी करुन घेण्यात आली. काहींनी त्यास विरोध करत न्यायालयात धाव घेतली. पुनर्वसन कामात काही लोकांची नाराजी आली. 

हे सर्व होत असताना मंदीर प्रशासन आपल्यावर अन्याय करत असल्याची भावना निर्माण झालेले लोक विरोधी भूमिका घेत आहेत. मात्र, यात भाविक वेठीस धरला जात आहे. विदर्भाची कन्याकुमारी अशी ओळख देणाऱ्या आंनद सागर प्रकल्पाबाबतही तक्रारी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आनंद सागराची वेळ कमी करण्यात आली आहे. आतील खेळ व इतर मनोरंजन बंद करण्यात आले आहेत. सद्या सुट्या असल्याने लाखो भाविकांची शेगावला गर्दी असते. मात्र, आनंद सागर मधील पर्यटनाचा आंनद घेता येत नसल्याने भाविकांची निराशा होत आहे.

पर्यटन संख्या रोडावली असल्याने  व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. आनंद सागर परिसरात नव्याने हॉटेल व्यवसाय सुरू केलेल्या एका व्यक्तीने सांगितले की मी कोट्यवधी कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला मात्र आता भावीक कमी असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान मंदिर व्यवस्थापनाचे निर्णय काही लोकांना आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरत असल्याने त्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. 

वान पाणी पुरवठा योजनेची लोकवर्गणी व इतर लोकहिताची कामे संस्थानेच केली आहेत. आणखी मोठे प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून येणार असल्याचे कळते.  मंदिर विरोधात काही लोकांनी उभे केलेले हे आंदोलन त्यात अडथळा ठरत आहे. त्याला मिळणार पाठबळ कुणाचं हा प्रश्न चर्चेत आला आहे.

आदर्श संस्थान
सेवा, शिस्त आणि स्वच्छता यासाठी श्री गजानन महाराज संस्थान एक आदर्श आहे. भाविकांची कोणतीही लूट येथे होत नाही. समाजहिताचे विविध 42 सेवा प्रकल्प हे संस्थान राबवित आहे.एखादी संस्था इतके  चांगले काम करत असेल तर त्यांना इतका टोकाचा विरोध करणे कितपत योग्य आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे.

शेगाव नगर पालिका व मतदार संघात भाजपाची सत्ता आहे. मंदिर विरोधी आंदोलनात काही भाजपा पदाधिकारी प्रत्यक्ष सहभाग घेत आहेत. आमदार डॉ. संजय कुटे यांचे काही निकटवर्तीय त्यात आहेत. ही सर्व बाब लक्षात घेता वरीष्ठ पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी या प्रकरणात लक्ष देवून आंदोलक व मंदिर यात तोडगा काढणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com