Marathi Political News Sanjay Dhotre Ranjit Patil BJP | Sarkarnama

डॉ. रणजित पाटलांना मंत्रीमंडळातून हाकला : खासदार संजय धाेत्रे

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 1 मार्च 2018

"सत्तेचा दुरूपयाेग करून जिल्ह्यातील गाेर-गरीब जनतेवर अन्याय, अत्याचार करून गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी परिसीमा गाठली अाहे. रणजित पाटील कुटूंबियांच्या अशा कृत्यामुळे मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का बसला अाहे. त्यांच्या पापाचा घडा अाता भरला असुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीमंडळातून हाकलावे,'' अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते खासदार संजय धाेत्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली अाहे.

अकाेला : "सत्तेचा दुरूपयाेग करून जिल्ह्यातील गाेर-गरीब जनतेवर अन्याय, अत्याचार करून गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी परिसीमा गाठली अाहे. रणजित पाटील कुटूंबियांच्या अशा कृत्यामुळे मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का बसला अाहे. त्यांच्या पापाचा घडा अाता भरला असुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीमंडळातून हाकलावे,'' अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते खासदार संजय धाेत्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली अाहे. मुख्यमंत्र्यांनी रणजित पाटलांची हकालपट्टी न केल्यास काय करायचे हे मला चांगले पद्धतीने माहिती अाहे. पुढच्या पंधरा दिवसात अापण अापली भुमिका जाहीर करू असा गर्भित इशारा खासदार धाेत्रे यांनी दिला अाहे. 

जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील खासदार संजय धाेत्रे विरुद्ध गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील गटाचा वाद अाता विकाेपाला गेला अाहे. डाॅ. पाटील यांच्यावर आरोप करताना धोत्रे म्हणाले, "डॉ. रणजित पाटील यांचे गाव असलेल्या घुंगशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादात डॉ. पाटील यांच्या नातेवाईकांकडून हिम्मतराव देशमुख व त्यांच्या पत्नीला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली अाहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेवर पाटील कुटुंबियांकडून अत्याचार वाढले असुन पाेलिस व सरकारी यंत्रणा त्यांच्या दबावामुळे कारवाई करीत नाही. जिल्ह्यातील जनता माेठ्या विश्वासाने भाजला विजयी करीत असुन रणजित पाटील यांच्या कुटुंबियांच्या अशा कृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला माेठा धक्का बसत आहे,'' 

अाजपर्यंत रणजित पाटील यांनी सत्तेचा दुरूपयाेग करून अनेक गंभीर प्रकरणे केले असुन त्याचे सर्व पुरावे अापल्याकडे अाहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा वादग्रस्त मंत्र्याला मंत्रीमंडळात ठेऊन पक्षाची प्रतिमा मलिन करू नये. त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी मी करीत नसून त्यांना मंत्रीमंडळातून हाकला अशी मागणी करीत असल्याचे खासदार धाेत्रे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा. तसे न झाल्यास काय करायचे हे मला चांगल्या पद्धतीने माहित असुन मी सुद्धा 30 वर्षापासून राजकारणात अाहाे, असा इशारा खासदार संजय धाेत्रे यांनी दिला अाहे. 

''विकास, कामे ह्या नंतरच्या गाेष्टी अाहेत. मात्र, नागरिकांचे मुलभूत अधिकार, सुरक्षा, त्यांचा सन्मान, प्रतिष्ठेचे जगण, व्यक्ती स्वातंत्र्य, लाेकशाहीचे मुल्य जपन हे माझ्या दृष्टीने महत्वाचे अाहे. असे जर मी जगु शकत नसले तर एखाद्या वेळी मी मरणही पत्करेल. मला लाज वाटते मी ज्या जिल्ह्याचा लाेकप्रतिनिधी अाहाे, त्या जिल्ह्यातील जनतेवर अशा पद्धतीने अत्याचार हाेत असेल ही माझ्यासाठी व पक्षासाठी अत्यंत खेदाची बाब आहे," असेही खासदार धाेत्रे यांनी सांगितले. 

अाम्ही चांगले अाहाेत म्हणुन लाखाे लाेकं अाम्हाला निवडून देतात. पण त्यांच्यावरच असा अन्याय हाेत असेल तर त्याविरुद्ध मला अावाज उठवावाच लागणार असेही खासदार धाेत्रे म्हणाले. खासदार धाेत्रे यांच्या मागणीमुळे भाजपमधील अंतर्गत वादाने अाता अंतीम टाेक गाठले अाहे. खासदार धाेत्रे, अामदार गाेवर्धन शर्मा, अामदार रणधीर सावरकर यांच्यासह जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अाता उघडपणेच गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याविराेधात ताेफ डागल्याने जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली अाहे. 

'गुन्हे दाखल करून अटक करा'
घुंगशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे नातेवाईक असलेल्या देवेंद्र पवित्रकार यांनी हिम्मतराव देशमुख यांच्या बाेटाला चावा घेऊन त्यांचे बाेट तोडले, तसेच देशमुख यांच्या पत्नीला सुद्धा मारहाण करून विनयभंग केला, अशी तक्रार मुर्तिजापूर पाेलिस स्टेशनला देण्यात अाली अाहे. मात्र, पाेलिसांनी डॉ. रणजित पाटील यांच्या दबावामुळे अाराेपींवर गुन्हे दाखल केले नसल्याचा अाराेप देशमुख कुटूंबियांनी केला अाहे. हिम्मतराव देशमुख यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.

या घटनेनंतर गुरूवार (ता.एक) खासदार संजय धाेत्रे, अामदार गाेवर्धन शर्मा, अामदार रणधिर सावरकर, महापाैर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थाेरात, महानगराध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, महापालिकेचे स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वोपचार रुग्णालयात जावुन देशमुख यांच्या प्रकृतीची चाैकशी केली. त्यानंतर खासदार धाेत्रे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा पाेलिस अधिक्षक यांचे कार्यालय गाठले. यावेळी जिल्हा पाेलिस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांनी सर्व प्रकार सांगुन या घटनेतील अाराेपींवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.

संबंधित लेख