सांगलीत शिवसेनेची "दखलपात्र' होण्यासाठी ताकद पणाला...!

सांगलीच्या राजकारणात एरवी जमेत धरली न जाणारी शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीसाठी पेटून उठली आहे. या निवडणुकीत "दखलपात्र' होण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. 15) सांगलीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन मेळावा होतोय. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या "स्वबळावर निवडणूक' मंत्राचा इथेही पुनरुच्चार करण्यात येतोय.
सांगलीत शिवसेनेची "दखलपात्र' होण्यासाठी ताकद पणाला...!

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक आगामी जुलै महिन्यात अपेक्षित आहे. त्यात सत्ताधारी काँग्रेसला भाजपचे मुख्य आव्हान असून या घडीला विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादीने कंबर कसलेली आहे. या तीन प्रमुख बलाढ्य पक्षांच्या गर्दीत 'दखलपात्र' होण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु आहे. त्यांनी निवडणूक जाहीर होण्याआधीच ताकद पणाला लावली आहे. 

रविवारी विष्णूदास भावे नाट्यमंदीर येथे होणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला पश्‍चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते गजानन किर्तीकर, खासदार अनिल देसाई, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अनिल बाबर आणि संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील अशी फौज मैदानात उतरणार आहे. 
जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या मेळाव्याची माहिती दिली. 

गेल्याच आठवड्यात बागुनडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेने 'भगवा फडकणारच' मेळावा घेतला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या आठवड्यात मोठा मेळावा आयोजित केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत महापालिकेने गांभिर्याने लढण्याचे आणि शिवसेना दखलपात्र आहे, हे दाखवण्याचे ठरवले आहे. 
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यात सर्वत्र स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनीही सांगलीत स्वबळावरच शिवसेना लढेल, असे आज जाहीर केले. ठाकरेसाहेबांच्या आदेशानुसार येथे बांधणी सुरु आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

या साऱ्या गोष्टींचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यातील पाच जणांची कोअर कमिटी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यात जिल्हाध्यक्ष संजय विभुते, आनंदराव पवार, युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज पवार, संघटक दिगंबर जाधव आणि नगरसेवक शेखर माने या पाचजणांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com