संभाजी ब्रिगेडच्या विरोधानंतर दादोजी कोंडदेवांची प्रतिमा हलवली

आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून महापालिकेच्या आवारातच दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने दोन तासांतच दादोजी कोंडदेवांची प्रतिमा हटविण्यात आली.
संभाजी ब्रिगेडच्या विरोधानंतर दादोजी कोंडदेवांची प्रतिमा हलवली

पुणे : आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून महापालिकेच्या आवारातच दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने दोन तासांतच दादोजी कोंडदेवांची प्रतिमा हटविण्यात आली.

पुणे महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हटविण्यात आला होता. पुतळा हटवल्यानंतर ब्राम्हण महासंघाची अशी मागणी होती, की पुण्यात कोठे तरी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा बसवावा. महापालिकेने तसे आश्वासन देखील दिले होते. म्हणून मनपा अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी आज (बुधवार) त्यांच्या पुण्यतिथी दिनी मनपा आवारात कोंडदेवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्ते महापालिका आवारात आले आणि दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत दादोजी कोंडदेव यांचा फोटो त्वरित हटविण्याची मागणी केली. थोड्यावेळाने ब्राम्हण महासंघाने दादोजी कोंडदेव यांचा फोटो महापालिकेच्या आवारातून काढून बाहेर नेला. त्यानंतर तणाव निवळला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाला महापौर मुक्ता टिळक आणि आमदार मेधा कुलकर्णी यांचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com